AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमचा घटस्फोट लवकरच होईल… आयुष शर्मा याचे विधान, सलीम खान यांना मी..

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची बहीण अर्पिता शर्मा हिचे लग्न आयुष शर्मा याच्यासोबत झाले. लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली असून पहिल्यांदाच आयुष शर्मा याने अर्पिता हिच्यासोबतच्या घटस्फोटावर मोठे भाष्य केले.

आमचा घटस्फोट लवकरच होईल... आयुष शर्मा याचे विधान, सलीम खान यांना मी..
Aayush Sharma salman khan Arpita khan
| Updated on: Jul 22, 2026 | 7:51 AM
Share

सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिचे लग्न आयुष शर्मा याच्यासोबत 2014 मध्ये झाले. लग्नाला इतकी वर्ष झाल्यानंतर आयुष शर्मा याने घटस्फोटावर भाष्य केले. हेच नाही तर आपला अर्पिता हिच्यासोबत घटस्फोट होऊ शकतो, असेही त्याने म्हटले. आयुष शर्मा म्हणाला की, माझे आणि अर्पिताचे लग्न झाल्यानंतर लोकांच्या कमेंटममुळे मला खूप त्रास व्हायचा. पण आता अजिबात फरक पडत नाही. आमच्या लग्नाला 12 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. माझा मुलगा 10 वर्षाचा आहे तर मुलगी 6 वर्षाची आहे. यादरम्यान मी फक्त तीनच चित्रपट केली, त्यापैकी एक ब्लॉकबस्टर ठरला. मी जर टिकेकडे लक्ष दिले तर माझ्या लग्नाचा नक्कीच अनादर होईल. मी माझ्या नात्याबद्दल का स्पष्टीकरण देऊ? मी एक मीम बघितले, जे माझ्यावर होते.

प्लेस्टेशनसाठी लोक काय काय करतात असे त्यात लिहिले होते. मी खरं सांगतो मला ते मीम पाहून राग अजिबात आला नाही. उलट मला हसू आले. मी लोकांची तोंड बंद करू शकत नाही, म्हणून मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. हेच नाही तर मला कोणीतरी बोलले होते की, तुझे चित्रपट चालले नाही तर अर्पिता तुझ्यासोबत घटस्फोट घेईल.

लवकरच तुमचा घटस्फोट होईल. त्यावर मी सरळ उत्तर दिले होते की, माझ्या वाईट जोकमुळे आमचा घटस्फोट नक्कीच होईल. यावेळी तो अर्पिता खान हिच्या कुटुंबाबद्दल बोलताना दिसला. यासोबतच सलीम खान यांना आजपर्यंत डॅडी बोलू शकलो, नसल्याचेही आयुष शर्मा याने म्हटले. त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. मी त्यांना बोलताना कायमच मान खाली घालतो. त्यांनी बोलल्याशिवाय मी त्यांना बोलतही नाही.

सलीम खान यांनी अर्पिता हिला दत्तक घेतले. सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान आणि अलविरा अग्निहोत्री यांच्यासोबतच तिचे पालन पोषण केले. अर्पिता खान कायमच चर्चेत असते. अर्पिता खान हिच्या लग्नात अत्यंत लग्झरी फ्लॅट तिला खान कुटुंबियांकडून देण्यात आला. मात्र, तो फ्लॅट सोडून नुकताच ती इतरत्र शिफ्ट झाली. सलमान खान याच्यासोबत अर्पिता खान हिची मुलगी आणि मुलगा कायमच स्पॉट होतात. मामाची अत्यंत लाडकी अर्पिताची मुलगी आहे. आयुष शर्मा पहिल्यांदाच अर्पिता हिच्यासोबतच्या नात्यावर बोलताना दिसला. यासोबतच तो सलमान खानच्या आयुष्याबद्दलही बोलताना दिसला.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना