AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhishek Bachchan | 2016 नंतर का घेतला ब्रेक? अभिषेक बच्चनचा मोठा खुलासा, चित्रपटांचे पैसेही केले परत

'धूम 3' या चित्रपटात इन्स्पेक्टर जयची भूमिका साकारल्यानंतर अभिषेकने काही हलक्या फुलक्या विषयांचे चित्रपट निवडले. यात हॅपी न्यू इअर, द शौकीन्स, ऑल इ वेल आणि हाऊसफुल 3 यांचा समावेश आहे. त्यानंतर त्याने ब्रेक घेतला.

Abhishek Bachchan | 2016 नंतर का घेतला ब्रेक? अभिषेक बच्चनचा मोठा खुलासा, चित्रपटांचे पैसेही केले परत
Abhishek BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 26, 2023 | 8:16 AM
Share

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चनने गेल्या 23 वर्षांच्या करिअरमध्ये फिल्म इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अनेकदा वडील अमिताभ बच्चन आणि पत्नी ऐश्वर्या राय यांच्याशी तुलना होऊनसुद्धा त्याने टीकाकारांना सडेतोड उत्तरं दिली. वडील बॉलिवूडचे महानायक असताना अभिषेकने स्वत:च्या बळावर चौकटीबाहेरच्या भूमिका साकारल्या. मात्र तरीसुद्धा सोशल मीडियावर त्याला त्याच्या करिअरवरून सतत ट्रोल केलं जातं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकने 2016 नंतर अभियनातून ब्रेक घेण्यामागचं कारण सांगितलं. 2016 मध्ये त्याचा ‘हाऊसफुल 3’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याने कामातून ब्रेक घेतला. त्याक्षणी त्याने साइन केलेल्या काही चित्रपटांमधूनही माघार घेतल्याचा खुलासा अभिषेकने केला.

‘धूम 3’ या चित्रपटात इन्स्पेक्टर जयची भूमिका साकारल्यानंतर अभिषेकने काही हलक्या फुलक्या विषयांचे चित्रपट निवडले. यात हॅपी न्यू इअर, द शौकीन्स, ऑल इ वेल आणि हाऊसफुल 3 यांचा समावेश आहे. त्यानंतर त्याने ब्रेक घेतला आणि 2018 मध्ये तो ‘मनमर्जियाँ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र या चित्रपटात त्याची मुख्य भूमिका नव्हती. अभिनेत्री तापसी पन्नू आणि विकी कौशल यांच्यासोबत त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती.

का घेतला ब्रेक?

ई टाइम्सला दिलेल्या या मुलाखतीत अभिषेकने ब्रेक घेण्यामागचं कारण सांगितलं. “त्यावेळी मी खूप आत्मसंतुष्ट होतो. मला उत्तम काम मिळत होतं, भरपूर पैसा मिळत होता. सगळे चित्रपट सुपरहिट झाले होते. पण मला माहीत होतं की स्वत:ला आणखी पुढे ढकलत नव्हतो.”

साइनिंग अमाऊंट केली परत

याविषयी तो पुढे म्हणाला, “मी या चित्रपटात डोळे झाकून काम करू शकतो, असा विचार कधीच तुम्ही करू नये. तुम्ही असं काम करायला जाऊ शकत नाही कारण लोक त्यांच्या कष्टाचे पैसे त्यात गुंतवत आहेत. तुम्हाला रात्र-रात्रभर जागून काम करावंच लागेल. एक कलाकार म्हणून तुम्हाला जी भेट मिळालेली असते त्याची किंमत तुम्ही कुठेतरी अशा पद्धतीने चुकवता. जेव्हा हे सगळं थांबतं आणि सर्वकाही सहजरित्या तुम्हाला मिळू लागतं, तेव्हा तुम्ही तुमचा प्रवास अधोगतीच्या दिशेने सुरू करता आणि अशाच परिस्थितीत मी होतो. त्यामुळे मी स्वत:लाच म्हणालो की आता थांबलं पाहिजे. त्यावेळी मी जे चित्रपट साइन केले होते, ज्यांची शूटिंग सुरू झाली नव्हती, त्यांचे पैसे मी परत केले. मला काही गोष्टींचं पुनर्मूल्यांकन करायचं आहे, असं मी त्यांना सांगितलं. तो ब्रेक मी घेतला आणि जेव्हा परतलो तेव्हा निवडक चित्रपट स्वीकारण्यास सुरुवात केली. अशा चित्रपटांमध्ये काम करताना मला रात्रीचीही झोप येत नाही.”

गेल्या वर्षी अभिषेकने ‘दसवी’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. यामध्ये निम्रत कौर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत होती. याशिवाय ‘ब्रीथ : इन्टू द शॅडोज’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्येही तो झळकला. यावर्षी प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटात तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होता. अभिषेकने नुकतीच आर. बाल्की यांच्या ‘घुमर’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.