Chabuk : ‘चाबुक’ मधून होणार अभिनेता समीर धर्माधिकारी यांचा दमदार कमबॅक

Chabuk : ‘चाबुक’ मधून होणार अभिनेता समीर धर्माधिकारी यांचा दमदार कमबॅक
chabuk upcoming marathi movie

मराठी(Marathi Movie) चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी व अभिनेत्री स्मिता शेवाळे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. एका बऱ्याच मोठ्या काळा नंतर अभिनेता समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikarti) एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 29, 2022 | 7:00 AM

मुंबई : ‘चाबुक’ (Chabuk) म्हटला की लगेच प्राण्यांना काबूत ठेवण्यासाठी किंवा उधळलेल्या जनावरांना शांत करत आपल्या म्हणण्यानुसार वागायला लावणारं प्रभावी अस्त्र आठवतं, पण ‘चाबुक’ कधी नियतीचा, व्यवस्थेचा, प्रारब्धाचा, विचारांचा, रुढी-परंपरांचाही असू शकतो. त्यामुळं सर्वच बाबतीत चाबूकाचं महत्त्व अतिशय वेगळं आहे. माणसाला कधी कधी आपला स्वभाव किंवा विचार काबूत ठेवणं शक्य होत नाही, तेव्हा विचारांच्या चाबकाचे फटकारे त्याच्या मनावर उमटतात. असाच एक ‘चाबुक’ आता मराठी(Marathi Movie) चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी व अभिनेत्री स्मिता शेवाळे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. एका बऱ्याच मोठ्या काळा नंतर अभिनेता समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikarti) एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे छायाचित्रण आणि दिग्दर्शन करत कल्पेश भांडारकर (Kalpesh Bhadarkar) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप पाडली आहे. मधुर भांडारकर यांच्यासह कल्पेश यांनी हिंदीतल्या अनेक दिग्गजांसोबत चित्रपट केले आहेत. यानंतर ते आता स्वत:ची पहिली मराठी चित्रकृती घेऊन येत आहेत.

आता मराठी मधून करणार प्रेक्षकांचे मनोरंजन
आपल्या ‘श्रीष्टी मोशन पिक्चर कंपनी’ च्या बॅनरखाली ‘चाबुक’ या मराठी चित्रपटाच्या निर्मीती व दिग्दर्शनाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाची संकल्पना कल्पेश वासुदेव भांडारकर आणि समीर धर्माधिकारी यांची प्रमुख भुमिका आहे. चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी व अभिनेत्री स्मिता शेवाळे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत सुधीर गाडगीळ आणि मिलिंद शिंदे यांच्यासुद्धा भूमिका आहेत.

आत्मपरीक्षणाचा सणसणीत ‘चाबुक’

‘चाबुक’ या चित्रपटाबद्दल बोलताना कल्पेश सांगतात की, ‘वाट चुकलेल्याला जनावराला सरळ मार्गावर आणण्यासाठी चाबुक उपयोगी येतो. प्रत्येक व्यक्तीला आपण जे वागतो तेच बरोबर आहे असं वाटत असते. आपल्या विचारांच्या, वागण्याच्या चष्म्यातून प्रत्येक व्यक्ती स्वत:चे मत योग्य असल्याचे दुसऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. हे विचार समोरच्या व्यक्तीला नाही पटले तर एकमेकांमध्ये वाद निर्माण होतात. आत्मपरीक्षणाचा सणसणीत ‘चाबुक’ जर वेळीच ओढला गेला तर त्याचा नक्कीच फायदा होतो हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे. येत्या २५ फेब्रुवारीला ‘चाबुक’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

संबंधीत बातम्या :

सुशांत सिंह राजपूतच्या ड्रग तस्कर शेजाऱ्याला एनसीबीकडून अटक, तब्बल 8 महिन्यांनंतर एसीबीच्या जाळ्यात

मिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी

काखेतील केसांचा फोटो शेअर करत अभिनेत्री तिलोत्तमा म्हणते, ‘मी माफी मागणार नाही म्हणजे नाही!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें