सारा आणि श्रद्धाचीही चौकशी संपली; एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर

अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरने एनसीबीकडून चौकशी सुरु असून, सुशांतने ड्रग्ज घेतल्याची त्यांनी कबुली दिली आहे. (Sara Ali Khan and Shraddha Kapoor have confessed that Sushant Singh Rajput used to take drugs.)

सारा आणि श्रद्धाचीही चौकशी संपली; एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत हा ड्रग्जचं सेवन करायचा, अशी कबुली अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरने एनसीबीच्या चौकशीत दिली आहे. या चौकशीत या दोन्ही अभिनेत्रींनी अनेक धक्कादायक खुलासे केल्याने सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सारा आणि श्रद्धा कपूरची चौकशी संपली असून श्रद्धाची साडेपाच तर साराची साडेचार तास चौकशी करण्यात आली. सारा एनसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडली असून घरी जाण्यासाठी रवाना झाली आहे. (Sushant Singh Rajput sucide and Bollywood Drugs Connection)

ड्रग्जचं सेवन केल्याप्रकरणी सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची एनसीबीकडून स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे. यावेळी या दोघींनाही सुशांतसिंह राजपूत प्रकरणी प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी सुशांत ड्रग्जचं सेवन करत असल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. श्रद्धाने तर सुशांत सेटवरही ड्रग्जचं सेवन करायचा असं म्हटलं आहे. मात्र, या दोघींनी आपण कधीही ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचंही म्हटलं आहे.

 ‘माल’ म्हणजे ‘ड्रग्ज’ नव्हे हे दीपिकाला सिद्ध करावं लागेल: उज्ज्वल निकम

 

सुशांतसोबत रिलेशनशीपमध्ये होते: सारा

यावेळी सारा अली खानने आजपर्यंत समोर न आलेली अत्यंत महत्त्वाची माहिती एनसीबीला दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. सुशांतसिंह आणि मी रिलेशनशीपमध्ये होते. त्याच्याबरोबर मी थायलंडलाही जाऊन आले होते, असं साराने म्हटलं आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय असू शकतं? याची माहिती साराकडून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ड्रग्स प्रकरणात साराला आज 11वाजता ncb कार्यालयात चौकशी साठी बोलावलं होते. पण तिने तोच वेळ साडे बारापर्यंत वाढवून घेतला होता. त्यानंतर ती पावणे एकच्या सुमारास एनसीबी कार्यालयात आली होती. सारा घरातून निघाल्या नंतर प्रचंड तणावाखाली होती. साराने आज पांढरा रंगाचा आणि त्यावर गुलाबी फुल असलेला ड्रेस घातला होता. गाडीत सारा, तिचा अंगरक्षक आणि चालक हे तिघेच होते. Ncb कार्यालयाकडे तिची गाडी जात असताना सारा तोंडाला हात लावून बसली होती. अधूनमधून कुणाला तरी फोन लावून बोलत होती. Ncb कार्यालयात पोहचताच पोलिसांनी माध्यमाच्या गाड्या अडविल्या. गाडीतून उतरल्या नंतर सुद्धा साराच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव होता.

संबंधित बातम्या :

PHOTO : दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर NCB कार्यालयात, प्रश्नांची सरबत्ती

Deepika Padukone | दीपिका आणि साराचा ड्रग्ज सेवन केल्याचा इन्कार; चौकशी सुरूच

Drug Case | श्रद्धा कपूरचा फोन एनसीबीच्या ताब्यात

(Sushant Singh Rajput sucide and Bollywood Drugs Connection)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *