अंजलीशी लग्नापूर्वी सचिन तेंडुलकर बिग बॉसच्या या स्पर्धकाला करत होता डेट ? अखेर खुलासा झालाच..
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे लग्न अंजली तेंडुलकरशी झाले आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण यापूर्वी या क्रिकेटपटूचे नाव काही बॉलिवूड अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. बिग बॉसच्या या स्पर्धकासोबत सचिन तेंडुलकरच्या अफेअरबद्दल चर्चा होत होत्या हे जाणून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला देव म्हटले जाते. त्याने केवळ भारतासाठीच नाही तर क्रिकेट जगतासाठी दिलेले योगदान अद्भुत आहे. तो रिटायर होऊन बरीच वर्ष उलटली तरी अजूनही जगभरात सचिनचे लाखो चाहते आहेत आणि अजूनही बरेच लोक सचिनला क्रिकेटचा देव मानतात. सचिन तेंडुलकरच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल खूप चर्चा होते पण त्या तुलनेत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कमीच चर्चा होते. पण तुम्हाला माहिती आहे का की एकदा सचिन तेंडुलकरचे एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याची अफवा पसरली होती.
सचिनसोबतच्या अफेअरबद्दल शिल्पा काय म्हणाली ?
अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते, ज्यामध्ये तिला सचिनसोबतच्या तिच्या अफेअरच्या अफवांबद्दलही विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना शिल्पा म्हणाली- ‘हम’ चित्रपटात काम करत असताना मी पहिल्यांदा सचिनला भेटले. त्याचं कारण म्हणजे सचिन जिथे राहत होता, तिथे माझा भाऊही राहत होता. त्या काळात ते दोघेही वांद्रे पूर्वेसाठी एकत्र क्रिकेट खेळत असत. मी सचिनला तेव्हापासून ओळखत होतो. पण त्यावेळी सचिन आणि अंजलीचे आधीच प्रेमसंबंध होते. पण याबद्दल कोणालाही माहिती नव्हती. आम्हाला हे माहित होते कारण आम्ही मित्र होतो.’
सचिन-शिल्पाच्या अफेअरची चर्चा का ?
शिल्पा शिरोडकर म्हणाली की ती एक अभिनेत्री होती आणि सचिन एक क्रिकेटपटू होता. त्यामुळे लोकांना आमचं नावं एकमेकांशी जोडणं सोपं झालं. पण शिल्पाच्या सांगण्यानुसार, ती सचिनला फक्त एकदाच भेटली होती. शिल्पा शिरोडकरबद्दल सांगायचं झालं तर ती 90 च्या दशकातील नामवंत अभिनेत्री होती. तसेच तिची बहीण नम्रता शिरोडकर हीदेखील नावाजलेली अभिनेत्री असून साऊथ सुपरस्टार महेश बाबूशी तिचं लग्न झालंय. शिल्पा शिरोडकर ही काही महिन्यांपूर्वी ती सलमान खानच्या बिग बॉस शोमध्ये दिसली आणि त्याद्वारे ती बरीच लोकप्रियताही झाली. याशिवाय शिल्पाने अभिनेत्रीने किसन कन्हैया, टिळक, खुदा गवाह, गोपी किसान, बेवफा सनम, बंदिश आणि अपना दम पर असे अनेक चित्रपट केले आहेत.
