Filmfare Awards : अभिनेत्री शिवानी सुर्वेला ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार’, मराठी फिल्म फेअर सोहळ्यात जलवा

मराठी सिनेसृष्टीतील मानाचा समजला जाणारा 'मराठी फिल्म फेअर पुरस्कार' सोहळा नुकताच पार पडला. (Actress Shivani Surve to receive 'Best Debut Award' at 'Marathi Film Fair')

  • Updated On - 6:23 pm, Tue, 2 March 21
Filmfare Awards : अभिनेत्री शिवानी सुर्वेला 'सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार', मराठी फिल्म फेअर सोहळ्यात जलवा

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील मानाचा समजला जाणारा ‘मराठी फिल्म फेअर पुरस्कार’ सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री शिवानी सुर्वे हीला तिच्या पहिल्या ‘ट्रिपल सीट’ सिनेमाकरीता ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) पुरस्कार’ मिळाला आहे. तिने या पुरस्कार सोहळ्यात निळ्या रंगाचा चमकदार गाऊन परिधान केला होता. या पुरस्कार सोहळ्यात ती अतिशय सुंदर दिसत होती. (Actress Shivani Surve to receive ‘Best Debut Award’ at ‘Marathi Film Fair’)

देवयानी या मराठी मालिकेतून मिळाली प्रसिद्धी

अभिनेत्री शिवानी सुर्वेला देवयानी या मराठी मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने जाना ना दिल से दूर, लाल इश्क, एक दिवाना था अश्या अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले. बिग बॉस मराठीच्या दुस-या सिझनमध्ये तीने ग्रॅंड फिनालेपर्यंत बाजी मारली होती. तसेच तिला या आधी व्हिएतनाममध्ये तिच्या ‘जाना ना दिल से दूर’ या हिंदी मालिकेकरीता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. शिवाय जाना ना दिल से दूर ही हिंदी मालिका इंडोनेशिया आणि व्हिएतनाममध्ये डब होऊन प्रसारीत झाल्यापासून शिवानीची आंतरराष्ट्रीय पातळीवरही चांगलीच फॅनफोलोविंग आहे.

अभिनेत्री शिवानी सुर्वेनं व्यक्त केल्या भावना

अभिनेत्री शिवानी सुर्वे फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्याबद्दल म्हणते, ”मला फिल्म फेअर पुरस्कार मिळाल्यामुळे २०२१ या वर्षाची सकारात्मक सुरूवात झाली आहे.मला फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यात, माझ्या पहिल्या सिनेमासाठी ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) पुरस्कार’ मिळाला. त्याबद्दल मी ट्रिपल सीट सिनेमाच्या संपूर्ण टीमचे आभारी आहे. यापुढे एक कलाकार म्हणून काम करताना मी खूप मेहनत घेईन, स्वत:ला कामात झोकून देईन. माझं नावं अनाउन्स होणं हे माझ्यासाठी खूप सरप्राइजींग होतं. फिल्म  फेअर पुरस्कार स्वीकारताना खूप आनंद झाला. या पुरस्कारामुळे नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा मला मिळाली.”

संबंधित बातम्या

ट्रोल करणाऱ्या सुशांतच्या चाहत्यांना अंकिता लोखंडेचे उत्तर, पाहा व्हिडीओ

निक्की तांबोळीचे किस प्रकरणावर मोठे भाष्य, म्हणाली…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI