या प्रसिद्ध सुंदर बॉलिवूड अभिनेत्रीचे हे घर आजही भूताने झपाटलेलं; एका रात्रीत केलं घर रिकामं
बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या कुटुंबासोबत घडलेल्या एका थरारक पॅरानॉर्मल घटनेचा खुलासा केला आहे. त्यांच्या त्या आजही घरात भूतांचा वावर असल्याचे तिने सांगितले. एका रात्री अशी काही भयानक घटना घडली की ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला एका रात्रीत ते घर सोडावे लागले होते. आजही ते घर रिकामे असून तिथे कोणीही जात नाही.

बॉलिवूड कलाकार हे फक्त ग्लॅमरस आणि चित्रपटांच्याच गप्पा करतता असं नाही, तर अनेकदा त्याहूनही वेगळ्या विषयांवर ते कायम बोलत असतात. जसं की पॅरानॉर्मल घटना. बऱ्याच सेलिब्रिटींसोबत पॅरानॉर्मल घटना घडलेल्या आहेत. त्याबद्दल ते बोललेले देखील आहेत. अशाच एका अभिनेत्रीने देखील तिच्या कुटुंबहासोबत घडलेल्या एका भयानक प्रसंगांबद्दल सांगितलं.
अभिनेत्रीच्या कुटुंबासोबत पॅरानॉर्मल अॅक्टिव्हीटी
या अभिनेत्रीच्या कुटुंबाचा जो राजवाडा होता तिथे काही पॅरानॉर्मल अॅक्टिव्हीटी घडल्या होत्या. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार एका आत्म्याने तिच्या पणजीला जोरदार चापट मारली होती. अशा काही विचित्र घटना घडू लागल्या होत्या की त्यांना रातोरात ते घर खाली करावं लागलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे सोहा अली खान.
त्या घरात भूतांचा वावर अजूनही आहे
बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खानने तिच्या हॉरर चित्रपटाचे प्रमोशन दरम्यान या घटनेबद्दल सांगितले होते. अभिनेत्रीने सांगितले होते की पतौडी कुटुंबाचे पूर्वीचे घर ज्याला पिली कोठी असे नाव होते. त्या घरात ही घटना घडली होती. तिच्यामते त्या घरात भूतांचा वावर अजूनही आहे. शिवाय, भुताने तिच्या पणजीला जोरदार गालावर चापट मारली होती. त्यानंतर, तिचे संपूर्ण कुटुंब रात्रीतून त्यांच्या हवेलीतून पळून गेले आणि पतौडी पॅलेसमध्ये जाऊन राहू लागले.
एका रात्री विचित्र काहीतरी जाणवलं
पतौडी कुटुंबाची पीली कोठी गुरुग्राम, हरियाणा येथील पतौडी पॅलेसजवळ आहे. ती त्यांच्या कुटुंबाची सर्वात जुनी मालमत्ता. सोहाने एका मुलाखतीत खुलासा केला की, तिच्या पणजीला एका रात्री विचित्र काहीतरी जाणवलं. एका भूताने तिला जोरात गालावर मारले होते आणि तिच्या गालावर त्याचे निशाणही उमटले होते. त्यानंतर तिच्या कुटुंबाने त्याच रात्री पीली कोठी रिकामी केली.
View this post on Instagram
आजही तिथे कोणीही राहण्याचे धाडस करत नाही
सोहाने खुलासा केला की ती स्वतः कधीही पीली कोठीत जाऊन राहण्याची हिंमत करणार नाही. दरम्यान आजही ती पीली कोठी रिकामीच असून तिथे राहण्याचे धाडस कोणी करत नसल्याचं तिने म्हटलं. आजही त्यांची ती मालमत्ता तशीच पडून आहे. तिथे आजही कोणी जात-येत नाहीत.
