या अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा; ब्लाउजशिवाय साडी नेसून केलं फोटोशूट, नेटकरी संतापले
एका अभिनेत्रीला तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तिने ब्लाउजशिवाय साडी नेसून फोटोशूट केलं आहे. तिचे फोटो पाहून नेटकरी संतापले असून तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

बॉलिवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री अभिनेत्रींचा बोल्डनेस किंवा, बोल्ड फोटोशूट हे अगदी सामान्य झालं आहे. तसेच ट्रेंडिंगही आहे. बॉलिवूडच्या कियारा अडवानीपासून ते मराठीतील वनिता खरात पर्यंत सर्वच अभिनेत्रींनी असो बोल्ड फोटो शूट केलं आहे. अर्थात ते करणं इतकं सोपही नसतं कारण अशा फोटोशूटवर नेटकऱ्यांकडून अभिनेत्रींना ट्रोल करण्यात येतं. असंच काहीसं झालं आहे एका अभिनेत्रीसोबत. जिने बोल्ड फोटोशूट केलं आहे. तेही ब्लाउजशिवाय साडी नेसून. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करवा लागत आहे.
अभिनेत्री तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे देखील चर्चेत आहे
ही अभिनेत्री बिग बॉस 19 मध्ये सहभागी होणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. असे म्हटले जात आहे की निर्मात्यांनी तिला शोसाठी संपर्क साधला आहे. तथापि, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. ही अभिनेत्री आहे सुंदस मौफकीर ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सुंदस अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे. सुंदस ही एक मोरोक्कन मॉडेल आहे आणि ती भारतीय टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. तसेच ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे देखील चर्चेत असते.
फोटोंमध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे.
दरम्यान, सुंदसचा एक नवीन फोटोशूट इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये सुंदस खूपच ग्लॅमरस दिसत आहे. सुंदसने शनिवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या फोटोशूटचे फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे.
View this post on Instagram
ब्लाउजविनाच साडी नेसली
फोटोशूटमध्ये सुंदस वधूसारखी वेशभूषा केलेली दिसत आहे. कपाळावर टिकली, गळ्यात सुंदर हार आणि हातात तसेच शरीरावर मेहंदी घालून, सुंदस खूपच ग्लॅमरस दिसत आहे.तिने काळ्या रंगाची बनारसी साडी नेसली आहे, पण सुंदसने ब्लाउजविनाच साडी नेसली आहे. ब्लाउजऐवजी तिने सुंदसने फुलांचा अगदी वेगळ्या पद्धतीने वापर केलेला दिसत आहे. सुंदसची ही फॅशन पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
फोटो पाहून नेटकरी खूप संतापले
सुंदसने फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. पण हे फोटो पाहून नेटकरी खूप संतापले आणि त्यांनी या फोटोंवरून कमेंट्स करायला सुरुवात केली तसेच तिला प्रचंड ट्रोलही केलं. यावर टिप्पणी करताना, बहुतेक वापरकर्त्यांनी मूल्यांबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. एका युजरने लिहिले आहे की,”फॅशनच्या नावाखाली एवढंच पाहायचं बाकी होतं” दुसऱ्या युजरने लिहिलं ” हे सर्व करून तुम्ही काय सिद्ध करू इच्छिता?” अशा पद्धतीने तिला या फोटोशूटवरून प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे.
