AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेजस्विनी लोणारी हिने समाधान सरवणकरसोबतचे हनिमूनचे खास फोटो केले शेअर, म्हणाली, तो मला…

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने समाधान सरवणकर याच्यासोबत लग्न केले. साखरपुडा आणि लग्न दोन्ही मुंबईत पार पडले. लग्नाची आणि साखरपुड्याची फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली. आता अभिनेत्री हनिमूनसाठी थेट लंडनला पोहोचली.

तेजस्विनी लोणारी हिने समाधान सरवणकरसोबतचे हनिमूनचे खास फोटो केले शेअर, म्हणाली, तो मला...
Tejaswini Lonari
| Updated on: Dec 09, 2025 | 4:52 PM
Share

प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट भूमिका दिल्या आहेत. तेजस्विनी लोणारी हिची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. काही दिवसांपूर्वी तेजस्विनीचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर सर्वांना तिच्या लग्नाची आतुरता होती. तेजस्विनीचे लग्न मुंबईत मोठ्या धूमधडाक्यात झाले. तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. अभिनेत्रीने एकनाथ शिंदे गटाचे बडे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर याच्यासोबत लग्न केले. समाधान सरवणकर राजकारणात प्रचंड सक्रीय असून वरळी मतदार संघात त्यांचे वर्चस्व बघायला मिळते. समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी यांचा साखरपुडा आणि लग्न दोन्ही मुंबईत झाला. या लग्नाला राज्यातील बड्या नेत्यांसह कलाकारांनी हजेरी लावली.

तेजस्विनी लोणारी ही लग्नानंतर सर्व विधी करताना दिसली. प्रत्येक अपडेट आपल्या चाहत्यांसोबत ती शेअर करत होती. आता शेवटी तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर हनिमूनसाठी थेट लंडनला पोहोचले आहेत. यादरम्यानचे काही खास फोटो तेजस्विनी लोणारी हिने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. यावेळी अभिनेत्रीचा जबरदस्त असा लूक दिसतोय. समाधान सरवणकरसोबत धमाल लंडनला करताना तेजस्विनी दिसत आहे.

समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी यांचे लग्न 4 डिसेंबर रोजी झाले. देवदर्शनानंतर हनीमूनसाठी त्यांनी थेट लंडन गाठले. विशेष म्हणजे लंडनमधील फोटो शेअर करत अभिनेत्रीने अत्यंत खास असे कॅप्शन दिले आहे. अभिनेत्रीने फोटो शेअर करत म्हटले की, तो मला हसवतो तसे दुसरे कुणीही हसवू शकत नाही… विशेष म्हणजे फोटोमध्ये तेजस्विनी आनंदाने हसताना दिसत आहे.

चाहत्यांना तेजस्विनीचा लूक जबरदस्त आवडताना दिसत आहे. लोक तेजस्विनीच्या लूकचे काैतुक करत आहेत. अशीच कायम आणि आयुष्यभर आनंदी राहा… असा सल्ला चाहते तेजस्विनीला देत आहेत. लंडनमधून अनेक फोटो आपल्या चाहत्यांसाठी तेजस्विनी शेअर करताना दिसत आहे. समाधान सरवणकर आणि तेजस्विनी लोणारी यांनी एकमेकांना काही दिवस डेट केल्यानंतर लग्न केल्याच्या चर्चा रंगताना दिसल्या.

माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्...
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्....
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात.
परबांकडून कुणाचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख? सत्ताधाऱ्यांचा गदारोळ
परबांकडून कुणाचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख? सत्ताधाऱ्यांचा गदारोळ.
नाहीतर घरी बसाव लागेल, लाडक्या बहिणीवरून फडणवीसांनी भाजप आमदाराला झापल
नाहीतर घरी बसाव लागेल, लाडक्या बहिणीवरून फडणवीसांनी भाजप आमदाराला झापल.
विधान परिषदेत अनिल परब भडकले, सभागृहात एकच गदारोळ, नेमकं घडलं काय?
विधान परिषदेत अनिल परब भडकले, सभागृहात एकच गदारोळ, नेमकं घडलं काय?.
CSMT स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार, फडणवीसांची मोठी घोषणा
CSMT स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार, फडणवीसांची मोठी घोषणा.
तुकाराम मुंढे यांचं हे कृत्य... भाजप नेत्याच्या आरोपानं खळबळ अन्....
तुकाराम मुंढे यांचं हे कृत्य... भाजप नेत्याच्या आरोपानं खळबळ अन्.....
विधानभवन परिसर विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणलं अन् सरकारला घेरलं
विधानभवन परिसर विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणलं अन् सरकारला घेरलं.
त्यांची गडगंड संपत्ती, 35 वकिलांची फौज अन्...सुरेश धस काय म्हणाले?
त्यांची गडगंड संपत्ती, 35 वकिलांची फौज अन्...सुरेश धस काय म्हणाले?.
दानवेंचा 'कॅश बॉम्ब' अन विरोधकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा; एवढ्या नोटा..
दानवेंचा 'कॅश बॉम्ब' अन विरोधकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा; एवढ्या नोटा...