अभिनेत्री झोयाचा दावा – राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अ‍ॅपसाठी न्यूड ऑडिशनची मागणी, सिंगापूरहून आला होता फोन

झोयाचा दावा आहे की राज कुंद्राच्या अटकेच्या दोन दिवस आधीपर्यंत तिला हॉटशॉट्स अॅपसाठी न्यूड ऑडिशन मागितले जात होते, (Actress Zoya claims - demand of audition for Raj Kundra's app, phone call from Singapore)

अभिनेत्री झोयाचा दावा - राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अ‍ॅपसाठी न्यूड ऑडिशनची मागणी, सिंगापूरहून आला होता फोन

मुंबई : ‘बडे अच्छे लगते हैं’ (Bade Achche Lagte Hain) सारख्या अनेक टीव्ही शोचा भाग असलेली अभिनेत्री झोया राठोड (Zoya Rathore) सध्या खूप ट्रोल होत आहे. ट्रोल होण्याचं कारण म्हणजे तिने अडल्ट चित्रपट उद्योगावर टीका केली आहे. झोयावर असे आरोपकेले जात आहेत की ती ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करते त्याबद्दलच ती वाईट बोलत आहे. आता या ट्रॉल्सवर झोयानं तिचं मौन सोडलं आहे. ईटाइम्सच्या अहवालानुसार, झोयानं खुलासा केला की ती राज कुंद्राच्या (Raj Kundra)  संपर्कात नव्हती, मात्र त्याचा पीए उमेश कामतच्या संपर्कात होती.

झोयाचा दावा आहे की राज कुंद्राच्या अटकेच्या दोन दिवस आधीपर्यंत तिला हॉटशॉट्स अॅपसाठी न्यूड ऑडिशन मागितले जात होते, ज्याला तिनं नकार दिला. रिपोर्टनुसार, झोयाने सांगितले की तिला एकदा खूप बोल्ड कंटेन्ट करण्याची ऑफर देण्यात आली होती, जे तिनं यापूर्वी कधीही केले नव्हतं.

उमेश कामतनं हॉटशॉटसाठी मागितलं न्यूड ऑडिशन

झोया म्हणाली की, याची निर्मिती यश ठाकूर करत आहेत, जे सिंगापूरमध्ये राहतात. त्याने सर्वात धाडसी कंटेन्ट तयार केला आहे. मला हॉटहिट या दुसऱ्या कंपनीनंही कामाची ऑफर दिली होती, ज्यांनी त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग करताना मी दाखवलेल्या बोल्डनेसच्या आधारावर मला पैसे देण्याची ऑफर दिली होती. या सोबत, त्यात कॉन्ट्रॅक्ट पेपर्स सुद्धा होता, ज्यात असं लिहिलं होतं की तो मला असे काही करायला सांगणार नाही ज्यामुळे मला अस्वस्थ वाटेल. या प्रकरणात तुरुंगात पोहचलेले ते पहिले लोक आहेत.

त्यानंतर झोयाने दावा केला की ती राज कुंद्राशी कधीच भेटली नाही किंवा बोलली नाही, पण तिला पीए उमेश कामतने हॉटशॉटमध्ये काम करण्यासाठी बोलावलं होतं. रिपोर्ट्सनुसार, झोया म्हणते की उमेश कामतनं तिला सांगितलं की तो तिला मोठा ब्रेक देईल, मात्र त्यासाठी तिला व्हिडीओ कॉलवर नग्न ऑडिशन द्यावं लागेल, पण झोयाने त्यास नकार दिला.

झोया सांगते की, उमेश कामत सतत तिच्याशी संपर्कात होता, ज्यामुळे तिचं मन वळले. ती म्हणते की, अटकेच्या दोन दिवस आधीपर्यंत उमेश कामत तिला हॉटशॉटमध्ये काम करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर तिला सिंगापूरहून रॉय नावाच्या एका माणसाचा फोन आला. त्यानं झोयाला नग्न ऑडिशन करण्यास सांगितले आणि हॉटशॉट्सचे नावही दिले.

राज कुंद्राबद्दल बोलताना झोया म्हणाली की मला माहित नाही की हा खेळ काय चालला होता, पण मी काही लोकांकडून ऐकलं आहे की राज कुंद्रा बॉलिवूडइतकाच मोठा उद्योग बनवायचा होता. आम्ही कलाकार या मोठ्या खेळाचे तुकडे होतो आणि माझ्यासारख्या कोणत्याही स्टारला पॉर्न स्टार म्हणून टॅग केलं जातंय.

संंबंधित बातम्या

Photo : स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी करीना कपूरचा फिटनेस मंत्रा, नियमित योगा करण्यावर देते भर

Photo : स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी करीना कपूरचा फिटनेस मंत्रा, नियमित योगा करण्यावर देते भर

Nandita Dutta Case: कोलकाता पॉर्न रॅकेट प्रकरणात आणखी एका फोटोग्राफर अटक, नव्या मॉडेल्सचे अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI