Nandita Dutta Case: कोलकाता पॉर्न रॅकेट प्रकरणात आणखी एका फोटोग्राफर अटक, नव्या मॉडेल्सचे अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप

अभिनेत्री नंदिता दत्ता आणि फोटोग्राफर मैनाक घोष यांच्या अटकेनंतर पोलिसांनी अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी आणखी एका फोटोग्राफरला अटक केली आहे. (Another photographer arrested in Kolkata racket case, accused of making dirty videos of new models)

Nandita Dutta Case: कोलकाता पॉर्न रॅकेट प्रकरणात आणखी एका फोटोग्राफर अटक, नव्या मॉडेल्सचे अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप

मुंबई : नॅन्सी भाभी (Nancy Bhabhi) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री नंदिता दत्ता  (Actress Nandita Dutta) आणि फोटोग्राफर मैनाक घोष (Photographer Mainak Ghosh) यांच्या अटकेनंतर पोलिसांनी अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी आणखी एका फोटोग्राफरला अटक केली आहे. शुभंकर दे असं या आरोपी फोटोग्राफरचं नाव आहे. तो मूळचा हुगळी जिल्ह्यातील आहे. तो नंदिता दत्तासोबत नवीन मॉडेल्सचे फोटो क्लिक करायचा अशा त्याच्यावर आरोप आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) पती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांनी अश्लील चित्रपट बनवल्याच्या प्रकरणानंतर कोलकात्यातही असे चित्रपट बनवल्याची बाब उघड झाली. त्याला अश्लील चित्रपटांचं शूटिंग आणि पॉर्न साइटवर अपलोड केल्याबद्दल अटक करण्यात आली. आरोपी मॉडेल नंदिता दत्ता (30) आणि छायाचित्रकार मैनाक घोष (39) सध्या तुरुंगात आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

अश्लील फोटोग्राफिमध्ये गुंतला होता शुभंकर दे 

पोलिसांचं म्हणणं आहे की, नंदिता दत्ता आणि मैनाक घोष यांच्या चौकशीत असं उघड झालं आहे की फोटोग्राफर शुभंकर दे अश्लील चित्रपट चित्रीकरणामध्ये सहभागी होता. त्याला हुगळी येथून अटक करण्यात आली आहे. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिस या आरोपींना चौकशीसाठी त्यांच्या ताब्यात घेण्याची विनंती करतील. दरम्यान, शनिवारी, आरोपी फोटोग्राफर मैनाक घोष यांच्यासह अश्लील चित्रपट बनवण्याच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी बल्लीगंजच्या गारफा पोलीस स्टेशन परिसरातील शरत पार्क रोडवरील एका स्टुडिओची झडती घेतली. चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाले. तपास अधिकाऱ्यांनी तिथून वापरलेले सर्व कॅमेरे आणि उपकरणे जप्त केली आहेत. त्यानंतर त्या स्टुडिओच्या मालकाला ताब्यात घेण्यात आले आणि न्यू टाऊन पोलिस स्टेशनमध्ये चौकशी केली.

नवीन मॉडेल्सना धमकी दिल्याचा आरोप

तक्रार करणाऱ्या मॉडेलनं पोलिसांना कळवलं होतं की तिचा अश्लील व्हिडीओ बालीगंज येथील स्टुडिओमध्ये धमकी देऊन शूट करण्यात आला होता. पोलीस तपास करत आहे की हा व्हिडीओ गारफाच्या त्याच स्टुडिओमध्ये शूट करण्यात आला आहे का? बल्लीगंज स्टेशनजवळ दुसरा स्टुडिओ आहे का?, याचाही पोलीस तपास सुरू आहे. गारफा स्टुडिओच्या मालकाची चौकशी करण्यात आली आहे. अश्लील व्हिडिओ टोळीमध्ये आणखी कोण सामील आहे किंवा नेटवर्क किती दूर पसरले आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

Photo : ‘बेल बॉटम’ रिलीज होण्यापूर्वी लारा दत्ताकडे पार्टी, अक्षय कुमार आणि हुमा कुरेशीची हजेरी

Good News : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या जीवनावर आधारित चित्रपटाची तयारी, अभिनेत्रीचा शोध सुरू

Gehana Vasisth : गेहना वशिष्ठचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाली अटक न करण्यासाठी केली 15 लाखांची मागणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI