Gehana Vasisth : गेहना वशिष्ठचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाली अटक न करण्यासाठी केली 15 लाखांची मागणी

अटकेच्या भीतीने गेहनानं सर्व दोष मुंबई पोलिसांवर टाकला आहे. तिनं दावा केला आहे की, पोलिसांनीच तिला या संपूर्ण प्रकरणात राज कुंद्रा आणि एकता कपूरची नावं घेण्यास भाग पाडलं आहे. (Gehna Vasisth's serious allegations against Mumbai police)

Gehana Vasisth : गेहना वशिष्ठचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाली अटक न करण्यासाठी केली 15 लाखांची मागणी

मुंबई : अश्लील चित्रपट रॅकेटमध्ये राज कुंद्राच्या (Raj Kundra Case) अडचणीत सतत वाढत होत आहे. राज सध्या 14 दिवस न्यायालयीन कोठडीत आहे. राज कुंद्राच्या आधी, ज्यांचं नाव या प्रकरणात आलं ती म्हणजे अभिनेत्री गेहना वशिष्ठ (Gehana Vasisth). या प्रकरणात गेहनाला पोलीस कोठडीत राहावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा गेहनाच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार दिसत आहे. अशा परिस्थितीत तिनं पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत.

अटकेच्या भीतीने गेहनानं सर्व दोष मुंबई पोलिसांवर टाकला आहे. तिनं दावा केला आहे की, पोलिसांनीच तिला या संपूर्ण प्रकरणात राज कुंद्रा आणि एकता कपूरची नावं घेण्यास भाग पाडलं.

गेहनाचा नवा खुलासा

इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत गेहनानं मुंबई पोलिसांवर आरोप केले आहेत. मला अटक न करण्यासाठी मुंबई पोलिसांनी 15 लाख रुपये मागितल्याचा दावा तिने केला आहे. गेहनाच्या म्हणण्यानुसार, पोलिसांकडून असं सांगण्यात आलं आहे की जर तिनं पैसे दिले तर तिला अटक केली जाणार नाही.

एवढंच नाही तर ती म्हणाली की मी पोलिसांना पैसे दिले नाहीत कारण मी काहीही चुकीचं केलं नाही. मी काम केलेले सर्व व्हिडीओ बोल्ड होते मात्र अश्लील नव्हते. अशा परिस्थितीत राज कुंद्रा आणि मी काहीही चुकीचं केलेलं नाही. असा आरोप गहनानं केला आहे.

गेहनाला झाली होती अटक

या प्रकरणात गेहनाला चार महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सध्या ती जामिनावर बाहेर आहे. मात्र या आठवड्यात तिच्याविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतंच गेहनानं एका व्हिडीओमध्ये म्हटलं होतं की, मुंबई पोलिसांनी तिच्याशी गैरवर्तन केलं आहे. ती सतत पोलिसांना दोष देत आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पोलिसांनी अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी 19 जुलै रोजी अटक केली होती. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवण्याचा आणि प्रसारित करण्याचा आरोप आहे. राज कुद्राला आता जामीन कधी मिळतो यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Gehna Vasisth’s serious allegations against Mumbai police)

संबंधिता बातम्या

Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

Bigg Boss 15 | अर्जुन बिजलानी ते नेहा भसीन, ‘हे’ कलाकार दिसणार ‘बिग बॉस 15’च्या घरात, पाहा संपूर्ण यादी!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI