हैदराबाद: ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचरल आहे. गेल्या काही दिवसांत प्रभासचं नाव बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनशी जोडलं गेलं. हे दोघं लवकरच लग्न करणार आहेत, अशी जोरदार चर्चा होती. मात्र क्रितीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर आता खुद्द प्रभासनेच त्याच्या लग्नाचा प्लॅन सांगितला आहे.