AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhishek Bachchan: ऐश्वर्या पाठोपाठ अभिषेक बच्चनही कोर्टात; नेमकं असं घडलं तरी काय?

Abhishek Bachchan: पत्नी ऐश्वर्या रायपाठोपाठ अभिषेक बच्चननेही दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावरून नेटकऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..

Abhishek Bachchan: ऐश्वर्या पाठोपाठ अभिषेक बच्चनही कोर्टात; नेमकं असं घडलं तरी काय?
Abhishek Bachchan and Aishwarya RaiImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 10, 2025 | 1:44 PM
Share

Abhishek Bachchan: अभिनेत्री ऐश्वर्या रायनंतर तिचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चन यानेसुद्धा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ऐश्वर्याने मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी याचिका दाखल केली होती. तिच्या नावाचा आणि फोटोंचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी कोणी करू नये, यासाठी तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्याचप्रमाणे एआयच्या मदतीने तिचे फेक अश्लील कंटेंट तयार करून ते व्हायरल करणाऱ्यांना आळा बसावा, यासाठी तिने हे पाऊल उचललं होतं. तिच्यानंतर आता अभिषेक बच्चनसुद्धा त्याच्या प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला आहे.

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, विविध वेबसाइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना त्याचे फोटो, बनावट व्हिडीओ आणि बनावट पद्धतीने तयार केलेला अश्लील कंटेंट वापरण्यापासून रोखण्याची विनंती अभिषेकने केली. अभिषेकचे एआय-जनरेटेड व्हिडीओ तयार केले जात आहेत आणि त्याच्या ऑटोग्राफचे बनावट फोटो बनवले जात असल्याचं त्याच्या वकिलांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर एआयद्वारे फेक व्हिडीओ तयार करून अश्लील कंटेंटसुद्धा बनवला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. डीपफेक फोटो आणि व्हिडीओंमुळे प्रतिमा मलिन होत असल्याची, प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याची तक्रार अभिषेक आणि ऐश्वर्याकडून करण्यात आली आहे.

ऐश्वर्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि प्रसिद्धीच्या अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी एक आदेश पारित केलं जाईल, असं दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी सूचित केलं. त्याचप्रमाणे विविध संस्थांना तिच्या संमतीशिवाय तिचं नाव, फोटो आणि आवाज व्यावसायिक फायद्यासाठी वापरण्यापासून रोखण्यात येईल. ऐश्वर्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या URL काढून टाकण्यासाठी पुढील निर्देश जारी करणार असल्याचं न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने मंगळवारी म्हटलं होतं. आता अभिषेकच्या बाबतीतही न्यायालय असेच निर्देश देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

याआधी अनेक कलाकारांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. अभिषेकचे वडील अमिताभ बच्चन यांनीसुद्धा 2022 मध्ये असंच पाऊल उचललं होतं. अनेकदा चुकीच्या हेतूने सेलिब्रिटींच्या फोटोंचा, नावाचा आणि फेक व्हिडीओंचा वापर केला जातो. याला आळा बसावा, यासाठी कलाकारांनी कायदेशीर मार्ग अवलंबला आहे.

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.