ऐश्वर्या लेक आराध्यासोबत बच्चन कुटुंबियांचं घर सोडणार, काय आहे कारण?
Aishwarya Rai and Aaradhya Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. तर त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात...

Aishwarya Abhishek on Aaradhya Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण ऐश्वर्या आज देखील कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आली होती. ऐश्वर्या आणि अभिनेता अभिषेक यांच्या नात्यात दुरावा निर्माण झालाय आणि दोघांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे… अशा सर्वत्र चर्चे रंगल्या. पण अनेक ठिकाणी ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसले… ज्यामुळे रंगणाऱ्या चर्चांवर पूर्णविराम लागला…
एवढंच नाही तर, ऐश्वर्या लेकीसोबत परदेशात शिफ्ट होणार अशा चर्चांनी देखील जोर धरलेला. ऐश्वर्याची लेक आराध्या सध्या शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. शिक्षण पूर्ण झालं की आराध्या आणि ऐश्वर्या परदेशात शिफ्ट होणार असं देखील सांगितलं जातं आहे…
रिपोर्टनुसार, अभिषेक – ऐश्वर्या यांनी लेक आराध्यासाठी मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. आराध्या बच्चन पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याचं कळत आहे…. उच्च शिक्षणासाठी आराध्या लंडन किंवा न्यूयॉर्क याठिकाणी जाऊ शकते. असं सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram
सध्या आराध्या धीरुबाई अंबानी शाळेत शिक्षण घेत आहे. 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आराध्या परदेशात जाईल.. असं सांगण्यात येत आहे. नुकताच आराध्या हिचा वाढदिवस झाला आणि नातीच्या वाढदिवशी महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आराध्या हिला शुभेच्छा दिल्या. बच्चन कुटुंबातील सर्वांत लहान सदस्य असल्यामुळे आराध्या सर्वांची लाडकी आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी अनेक वर्ष डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नानंतर 16 नोव्हेंबर 2011 मध्ये आराध्या हिला जन्म दिला.
आराध्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड्सच्या यादीत आराध्या अव्वल स्थानी आहे. सोशल मीडियावर देखील आराध्या हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेटकरी देखील आराध्याच्या प्रत्येक लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
