अभिषेकच्या वाढदिवसाला ऐश्वर्याची ‘ही’ खास पोस्ट, दोघांच्या नात्यात…
अभिषेक बच्चन याचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियावर सकाळपासूनच अभिषेक बच्चन याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. बच्चन कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्यांनी अभिषेक बच्चन याच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केलीये. अभिषेक बच्चन त्याच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे.

मुंबई : आज अभिषेक बच्चन याचा 48 वा वाढदिवस आहे. सकाळपासूनच चाहते हे अभिषेक बच्चन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन, श्वेता बच्चन, नव्या नवेली नंदा यांनीही खास पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिषेक बच्चन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यामध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सतत रंगत आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही काहीच भाष्य करताना दिसत नाहीये. अभिषेकच्या वाढदिवसामुळे सर्वांचे लक्ष हे ऐश्वर्या राय हिच्या सोशल मीडियावर अकाऊंटकडे लागले आहे.
शेवटी ऐश्वर्या राय हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत अभिषेक बच्चन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा या दिल्या आहेत. या पोस्टसोबतच ऐश्वर्या राय हिने दोन खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि त्यांची मुलगी आराध्या हे दिसत आहेत.
विशेष म्हणजे हे तिघेही खूप जास्त आनंदामध्ये दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये फक्त अभिषेक बच्चन हाच दिसतोय. विशेष बाब म्हणजे अभिषेक बच्चन याचा हा फोटो बालपणीचा दिसतोय. फक्त हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत अत्यंत खास असे कॅप्शन देखील शेअर केल्याचे बघायला मिळतंय.
View this post on Instagram
ऐश्वर्या राय हिने लिहिले की, जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… देव खूप आनंद, प्रेम, शांती आणि चांगले आरोग्यदायी आयुष्य देवो. चमकत राहा…या खास कॅप्शनसह अभिषेक बच्चन याला प्रेमाने शुभेच्छा देताना ऐश्वर्या राय ही दिसत आहे. आता ऐश्वर्या राय हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय.
काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय हिने थेट अभिताभ बच्चन यांना सोशल मीडियावरूनही अनफाॅलो केले. अभिषेक बच्चन याचे घर ऐश्वर्या राय हिने सोडल्याचे देखील सांगितले गेले. ऐश्वर्या राय हिच्या या पोस्टनंतर आता नक्कीच यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम लागल्या म्हणावा लागणार आहे.
View this post on Instagram
