आर्यन खान आणि राज कुंद्राला तुरुंगात मदत करणाऱ्या एजाज खान याने केली मोठी विनंती, ड्रग्ज प्रकरणात दोन वर्षे जेलमध्ये आता…
टीव्ही अभिनेता आणि बिग बाॅस फेम एजाज खान हा काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आलाय. विशेष म्हणजे तब्बल दोन वर्षांपासूनही अधिक काळ हा एजाज खान हा तुरुंगात होता. ड्रग्ज प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. आता नुकताच त्याने काही खुलासे केले आहेत.

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अभिनेता आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक एजाज खान (Ajaz Khan) हा 26 आठवडे म्हणजेच दोन वर्षे जेलमध्ये राहून परत आलाय. जामिनावर सध्या एजाज खान हा बाहेर आहे. ड्रग्ज प्रकरणात तब्बल दोन वर्षे जेलमध्ये राहण्याची वेळ ही एजाज खान याच्यावर आली. एजाज खान याच्या घरातून नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) ड्रग्ज जप्त केले. त्यानंतर त्याला थेट विमानतळाच्या परिसरातून अटक करण्यात आली. 30 मार्चला एनसीबीने एजाज याच्या घरी छापा टाकला होता आणि यामध्ये त्यांना काही औषधे सापडली ज्यावर भारतामध्ये बंदी आहे. 31 मार्च रोजी एनसीबीने एजाज खानला अटक (Arrested) केली आणि दोन वर्षे जेलमध्ये होता.
नुकताच एजाज खान हा जेलमधून बाहेर पडलाय. यावेळी त्याने एक मुलाखत देत काही मोठे खुलासे हे केले आहेत. एजाज खान याने सांगितले की, मी जेलमध्ये असताना आपल्या जवळच्या लोकांना सपोर्ट केला. आर्यन खान, राज कुंद्रा यांना माझ्याकडून जी काही मदत जेलमध्ये झाली ती सर्व मदत मी त्यांना करण्याचा प्रयत्न केला. जेलमध्ये गेल्यावर मला अन्नाची किंमत कळाली.
पुढे एजाज खान म्हणाला की, जेलमधील दोन वर्षे खरोखरच माझ्यासाठी खूप जास्त कठीण होती. मला माझ्या कुटुंबियांची खूप जास्त आठवण येत होती आणि मी त्यांना भेटू देखील शकत नव्हतो. याकाळात माझ्या अत्यंत जवळच्या लोकांनी देखील माझी साथ सोडून दिली. मी 400 कैद्यांसोबत राहत होतो. तिथे झोपण्याची देखील पुरेशी जागा नव्हती. 400 कैद्यांमध्ये तीनच टाॅयलेट होती.
ज्यावेळी मी गॅंगस्टरांसोबत राहत होतो, त्यावेळी मला अनेक गोष्टी या शिकण्यास मिळाल्या. जेलमध्ये दगडांच्या तादंळाचा भात आणि किडे पडलेले वरण खायला मिळायचे कधी कधी. ज्या जेलमध्ये कैद्यांची क्षमता 800 आहे तिथे एक हजार कैदी राहतात असेही एजाज खान हा म्हणाला आहे. एजाज खान याने या दिवसांना सर्वात वाईट दिवस असल्याचे देखील म्हटले.
या मुलाखतीमध्ये एजाज खान याने टीव्ही आणि बाॅलिवूड क्षेत्रातील लोकांना मदत मागितली आहे. एजाज खान म्हणाला की, माझे कुटुंब आहे. अगोदरच या सर्वांमधून निघणे माझ्यासाठी नक्कीच कठीण आहे. परंतू मला कामाची खूप जास्त गरज आहे. मी सर्वांना विनंती करतो की, मला काम द्या. एक अभिनेता म्हणून यादरम्यान प्लीज माझ्याकडे बघा असेही एजाज खान हा म्हणाला आहे.
