सस्पेंस आणि कॉमेडीने भरपूर ‘गुड न्यूज’ चा ट्रेलर प्रदर्शित

अक्षय कुमार आणि अभिनेत्री करीना कपूर खानच्या बहुप्रतिक्षित ‘गुड न्यूज’ (Good Newwz) सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे.

सस्पेंस आणि कॉमेडीने भरपूर ‘गुड न्यूज’ चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) यावर्षी बॉक्स ऑफिसवर हॅट्ट्रीक करणार आहे. ‘मिशन मंगल’ आणि ‘हाउसफुल 4’ यांसारख्या सिनेमांमधून बॉक्स ऑफीसवर करोडोंची कमाई केल्यानंतर आता अक्षय कुमारचा आणखी एक खास सिनेमा येत आहे. अक्षय कुमार आणि अभिनेत्री करीना कपूर खानच्या बहुप्रतिक्षित ‘गुड न्यूज’ (Good Newwz) सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे.

‘गुड न्यूज’ मध्ये अक्षय कुमार आणि करीना कपूरसोबतच अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh), आदिल हुसैन (Adil Hussain) आणि अभिनेत्री टिस्का चोप्रा (Tisca Chopra) हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत (Good Newwz Trailer).

‘गुड न्यूज’ सिनेमाचा ट्रेलर अत्यंत विनोदी आहे. हा ट्रेलर पाहून तुम्ही खदखदून हसल्याशिवाय राहणार नाही. या सिनेमात वरुण (अक्षय कुमार) आणि दीप्ती बत्रा (करीना कपूर खान) या दाम्पत्याला मुलं हवं असतं. यादरम्यान ते मिस्टर अँड मिसेस बत्रा (दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी) म्हणजेच मोनिका आणि हनी बत्रा यांना भेटतात. या दोन्ही जोडप्यांमध्ये वैर निर्माण होतो. यादरम्यान, अनेक विनोदी प्रसंग घडतात.

हा एक रोमँटिक-कॉमेडी सिनेमा आहे. राज मेहता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 27 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अनेक काळानंतर अक्षय कुमार आणि करीना कपूर खान एकत्र काम करणार आहेत. यापूर्वी त्यांनी ‘अजनबी’, ‘ऐतराज’, ‘टशन’, ‘बेवफा’, ‘कम्बख्त इश्क’ आणि ‘गब्बर इज बॅक’यांसारख्या सिनेमांमध्ये सोबत काम केलं आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *