प्रजासत्ताक दिनादिवशी अक्षय कुमारने लॉन्च केला FAU-G, म्हणतो आजपासून मिशन सुरु…!

आज प्रजासत्ताक दिनादिवशीच FAU-G हा गेम लॉन्च करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने याबाबतचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून या गेमची माहिती दिली आहे.

प्रजासत्ताक दिनादिवशी अक्षय कुमारने लॉन्च केला FAU-G, म्हणतो आजपासून मिशन सुरु...!

मुंबई :  PUBG गेमवर काही दिवसांपूर्वी भारतात बंदी आणण्यात आली होती. त्यानंतर आज प्रजासत्ताक दिनादिवशीच FAU-G हा गेम लॉन्च करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने याबाबतचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून या गेमची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अक्षयने लिहिले आहे की, शत्रूचा सामना करा, आपल्या देशासाठी लढा. या गेमचे Fearless and United Guards FAU-G असे नाव आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अक्षय कुमारने हा गेम शेअर केला आहे. (Akshay Kumar launches Fearless and United Guards FAU-G on Republic Day)

या गेमच्या व्हिडिओमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेला संघर्ष दाखवण्यात आला आहे. कशाप्रकारे आपल्या देशाचा झेंडा अचानक गायब केला जातो आणि त्यानंतर कशाप्रकारे आपल्या देशातील सैनिकांवर दगड टाकले जातात आणि त्यानंतर भारतीय सैनिक कशाप्रकारे जोरदार प्रतिउत्तर देतात हे सर्व यामध्ये दाखवण्यात आले आहे.

भारतात पब्जी गेमवर बंदी आल्यानंतर अक्षय कुमार आणि गेम क्रिएटर कंपनी एनकोर गेम्स यांनी मिळून FAU-G. ची घोषणा केली. Fearless And United-Guards FAU-G असे पूर्ण  आहे. हा गेम भारतीय सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना समर्पित आहे. अक्षय कुमार म्हणाला की, मनोरंजन व्यतिरिक्त हा गेम आमच्या सैनिकांच्या बलिदानाबद्दलही सांगतो. त्याचा 20%  महसूल ‘भारत के वीर’ ट्रस्टला देण्यात येणार आहे. हा गेम आपल्या मोबाईलमध्ये घेण्यासाठी अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला Google Play Store उघडावे लागेल. यानंतर आपल्याला Fearless And United-Guards FAU-G शोधावे लागतील. मग FAU-G वर क्लिक करा आणि डाउनलोड करू घ्या.

संबंधित बातम्या : 

सोनू सूदची शपथ ते जॉन अब्राहमचं चाहत्यांना गिफ्ट, बॉलिवडूने असा साजरा केला प्रजासत्ताक दिन…!

Satyamev Jayate 2 | ईदच्या मुहूर्तावर रिलीज होतोय जॉन अब्राहमचा चित्रपट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

‘हाऊज द जोश? हाय सर…’, विकी कौशलचा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

(Akshay Kumar launches Fearless and United Guards FAU-G on Republic Day)

Published On - 2:49 pm, Tue, 26 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI