Sooryavanshi : रोहित शेट्टीला सूर्यवंशी चित्रपटासाठी रिलीजचा मुहूर्त मिळेना!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाची चाहत्याते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Sooryavanshi : रोहित शेट्टीला सूर्यवंशी चित्रपटासाठी रिलीजचा मुहूर्त मिळेना!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाची चाहत्याते आतुरतेने वाट पाहत आहेत. अक्षय कुमारसोबत या चित्रपटात कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि रिलायन्स एंटरटेनमेंटची संपूर्ण टीम पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस आणि कार्निवल यांच्याशी चर्चा करीत आहेत. (Akshay Kumar’s Sooryavanshi movie will not be released on April 2)

अक्षय कुमार स्टारर चित्रपट ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट गुड फ्रायडेच्या दिवशी 2 एप्रिल रोजी प्रदर्शित व्हावा अशी निर्मात्यांची आणि दिग्दर्शकांची इच्छा होती. मात्र, सध्याची परिस्थिती पाहात असे वाटत की, सूर्यवंशी चित्रपट 2 एप्रिलला रिलीज होईल. यासंदर्भात नेटफ्लिक्स यांच्याशी चर्चा सुरू देखील होती मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्मने अक्षयचा चित्रपट खरेदी करण्यास नकार दिला असल्याची बातमी होती.

लॉकडाउननंतर रिलीज होणारा हा बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट असेल चित्रपटाचे टीझर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रिलीज झाले होते. मात्र, कोरोनामुळे चित्रपटाची तारीख बदलण्यात आली होती. सिंबा चित्रपटानंतर अक्षयने सूर्यवंशी या चित्रपटाची घोषणा केली होती. सिंबा चित्रपटातही अक्षय कुमारने काम केलं आहे.

सिंबा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसादही मिळाला आहे. रोहित शेट्टी यांनी सिंबा चित्रपटाशिवाय दिलवाले, सिंघम, चेन्नई एक्स्प्रेस, गोलमाल सीरीज, बोल बच्चन आणि ऑल द बेस्ट सारखे चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आतापर्यंत रोहित शेट्टी यांचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरले आहेत.

संबंधित बातम्या : 

प्रभासच्या ‘या’ चित्रपटाच्या एका सीनसाठी मोजले तब्बल इतके कोटी!

…तर अमिताभ बच्चन-अक्षयकुमारच्या सिनेमांचं शूटिंग-प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही : नाना पटोले

सनी लिओनचा निळा स्विमसूट इंटरनेटवर चर्चेत, लूक पाहून चाहतेही घायाळ!

(Akshay Kumar’s Sooryavanshi movie will not be released on April 2)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI