AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video | ‘ये चप्पल किसकी है?’ जेव्हा आलिया भट्ट हिने उचलली फोटोग्राफरची चप्पल; पुढे झालं तरी काय?

आलिया भट्ट हिने फोटोग्राफरची चप्पल तर उचलली... पण सोशल मीडियावर का करावा लागतोय अभिनेत्री ट्रोलिंगचा सामना? सोशल मीडियावर फक्त आणि फक्त आलिया भट्ट हिच्या व्हिडीओची चर्चा...

Viral Video | 'ये चप्पल किसकी है?' जेव्हा आलिया भट्ट हिने उचलली फोटोग्राफरची चप्पल; पुढे झालं तरी काय?
| Updated on: Jul 14, 2023 | 1:37 PM
Share

मुंबई | अभिनेत्री आलिा भट्ट (Alia Bhatt) सध्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. सिनेमात आलिया भट्ट हिच्यासोबत अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या आलिया आणि रणवीर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आगामी सिनेमामुळे चर्चेत असणारी आलिया आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. आलिया हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आलिया एका फोटोग्राफरची चप्पल उचलताना दिसत आहे. आलियाचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून काही चाहते अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत, तर काहींनी मात्र आलिया ट्रोल केलं आहे.

आलिया भट्ट हिला नुकताच आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्ट यांच्यासोबत स्पॉट करण्यात आलं. याच दरम्यान आलियाने असं काही केलं ज्यामुळे काही चाहत्यांनी आलियाला डोक्यावर घेतलं आणि तिचं कौतुक केलं. व्हिडीओमध्ये अभिनेत्री फोटोग्राफरला मदत करताना दिसत आहे.

आलिया हिला तिच्या आई आणि बहिणीसोबत पाहताच फोटोग्राफर आलिया हिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी जमले. तेव्हा एका फोटोग्राफरच्या पायातून चप्पल निघाली. तेव्हा खुद्द आलियाने चप्पल कोणाची आहे? असं विचारत फोटोग्राफरची चप्पल त्याला नेवून दिली. हे दृष्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आलियाचा स्वभाव पाहून चाहते अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी आलियाला ट्रोल करत म्हणाला, ‘एवढं नाटक करु नकोस की ते फेक वाटेल. सामान्य लोकं देखील अशी कोणाची चप्पल उचलत नाहीत.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘ती आगामी सिनेमाचं प्रमोशन करत आहे.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘सिनेमा येणार आहे म्हणून, नाही तर तोंड लपवून पळत असते..’

आलिया हिच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आलिया हिच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. आलिया देखील कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची माहिती आलिया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते.

आलिया हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा प्रेमकथेवर आधारलेला आहे.

‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ सिनेमाची कथा एका आलिया – रणवीर यांच्या प्रेमकहाणी भोवती फिरत आहे. सिनेमा २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात आलिया, रणवीर यांच्यासोबत जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आजमी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Follow Us
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती.
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप.
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा.
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.