आलिया भट्ट लेक राहाला ती 18 वर्षांची झाल्यावर देणार ‘हे’ खास गिफ्ट; आत्तापासूनच करतेय तयारी
आलिया भट्ट तिच्या लेकीबाबत राहाबद्दल किती प्रोटेक्टीव आहे हे सर्वांनाच माहित आहे. ती राहासाठी बऱ्याच गोष्टींचे नियोजन करत असते. तसेच अनेक मुलाखतींमध्येही ती राहाच्या सवयींबद्दल तसेच तिच्या लेकीबद्दल असलेल्या कल्पनांबद्दल बोलताना दिसते. आलियाने राहाला तिच्या 18 व्या वाढदिवसादिवशी काय खास गिफ्ट देणार आहे त्याबद्दल आधीच ठरवून ठेवलं आहे. ज्याची तयारी ती आत्तापासूनच करत आहे.

बॉलिवूडची टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली आलिया भट्ट अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती फक्त चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. शक्यतो आलिया ही तिची लेक राहा कपूरमुळे जास्त चर्चेत असते. तसेच ती अनेक मुलाखतींमध्ये आपल्या लेकीबद्दल बोलताना दिसते. राहाच्या भविष्याबद्दलही ती अनेकदा बोलत असते.
लेकीच्या 18 व्या वाढदिवसादिवशी देणार हे खास गिफ्ट
नुकतंच आलियाने तिच्या लेकीच्या 18 व्या वाढदिवसादिवशी ती तिला काय गिफ्ट देणार आहे त्याबद्दल विचार तिने केला आहे. आलियाने आतापासूनच त्याची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. अलिकडेच, आलिया भट्ट अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या टॉक शो ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ मध्ये दिसली, जिथे तिने राहासाठी ठरवलेल्या एका गोष्टीविषयी सांगितलं आहे. ते ऐकून सर्वांनाच तिचं कौतुक वाटलं.
आठवणी, फोटो आणि गोड संदेश
आलिया म्हणाली की तिला ही कल्पना तिच्या एका मैत्रिणीकडून मिळाली ज्याने तिच्या मुलासाठीही असेच केले होते. दर महिन्याला, आलिया तिच्या मुलीला एक ईमेल लिहिते, ज्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी, आठवणी, फोटो आणि गोड संदेश लिहिलेले असतात. ती म्हणाली ‘हे एक प्रकारचे दर महिन्याचे कम्पाइलेशन आहे, ज्यामध्ये फोटो आणि काही वन-लाइनर असतात. जसं की ‘तू हे खूप एन्जॉय करशील’
ट्विंकल खन्नाने केलं आलियाचे कौतुक
आलियाने असेही सांगितले की ती राहाला तिच्या 18 व्या वाढदिवशी हे सर्व ईमेल भेट म्हणून देणार आहे. तथापि, राहा 13 किंवा 14 व्या वर्षी ते वाचण्याचा आग्रह धरू शकते, असेही तिने सांगितले. दरम्यान आलियाची ही कल्पना उपस्थित असलेल्यांना सर्वांनाच खूप आवडली. ट्विंकल खन्नाने देखील आलियाच्या या कल्पनेला “खूप गोड आणि भावनिक” म्हटलं.
View this post on Instagram
आई होण्याचा अनुभव
आलियालाने तिची आई सोनी राजदानचं नाव काढत त्यांचं कौतुक केलं. ती म्हणते की तिची आई नेहमी म्हणायची, ” तुला आश्चर्य वाटेल की तुम्ही आई झाल्यानंतर कितीतरी गोष्टी विसरून जाता” ,पुढे आलियाने या वाक्यात खूप तथ्य आहे असं म्हणतं हे कबूल केलं की, आता ती स्वतः आई झाली आहे तर तिला ते किती खरे आहे याचे अनुभव येत आहेत.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची मुलगी राहाचे स्वागत केले. 2023 मध्ये कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीमध्ये राहाला पहिल्यांदा मीडियासमोर आणलं गेलं. तेव्हापासून स्टारकिड्समध्ये राहा नेहमीच आकर्षण राहिली आहे. तिचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.
आलियाच्या कामाबद्दल
आलिया लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या “लव्ह अँड वॉर” मध्ये रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्यासोबत दिसणार आहे. ती “अल्फा” मध्ये देखील दिसणार आहे. जो 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे आणि YRFस्पाय युनिव्हर्सचा भाग आहे.
