अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केली या बॉलिवूड अभिनेत्याच्या आईची शेवटची इच्छा; तिच्या मृत्यूनंतर घडला चमत्कार
एका बॉलिवूड अभिनेत्याच्या आईची इच्छा होती की या त्याच्या आईला अमिताभ बच्चन यांना भेटायचं होतं. तिने अनेकदा ही इच्छा अभिनेत्याजवळ बोलून दाखवली होती. पण त्याआधीच अभिनेत्याच्या आईचे निधन झाले. पण त्यानंतरही अमिताभ यांनी अभिनेत्याच्या आईची शेवटची इच्छा पूर्ण केली.

प्रत्येकाला आपल्या आवडत्या अभिनेत्याला आणि अभिनेत्रीला भेटण्याची इच्छा असते. अशीच इच्छा होती ते एका अभिनेत्याच्या आईची. होय, या अभिनेत्याच्या आईला अमिताभ बच्चन यांना भेटायचं होतं. तिने अनेकदा ही इच्छा अभिनेत्याजवळ बोलून दाखवली होती. पण त्याआधीच अभिनेत्याच्या आईचे निधन झाले. पण त्यानंतरही अमिताभ यांनी अभिनेत्याच्या आईची शेवटची इच्छा पूर्ण केली.
अभिनेत्याच्या आईचे निधन झाले आणि तिची इच्छा अपूर्ण राहिली
बिग बींना ज्या अभिनेत्याच्या आईला भेटायचं होतं तो अभिनेता म्हणजे राजकुमार राव. राजकुमार सुरुवातीपासूनच बिग बींचा चाहता आहे.त्याची आई देखील अमिताभची चाहती होती. राजकुमार राव अमिताभ बच्चन यांचे चित्रपट पाहतच लहानाचा मोठा झाला. त्याच्या आईचे स्वप्न होते की तिला बिग बींना एकदा भेटण्याचे होते. पण ते होऊ शकले नाही. राजकुमारच्या आईचे निधन झाले आणि तिची इच्छा अपूर्ण राहिली.
आईचे स्वप्न पूर्ण करू शकला नाही
राजकुमार राव बिग बींच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये क्रिती सेननसोबत गेला होता. दोघेही 2021 मध्ये आलेल्या ‘हम दो हमारे दो का’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. त्यानंतर राजकुमारने बिग बींना सांगितले होते की, ‘न्यूटन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझ्या आईचे निधन झाले होते आणि त्यांची नेहमीच इच्छा होती की तिची एकदा अमिताभ बच्चनशी ओळख करून द्यावी. जेव्हा आईचे निधन झाले तेव्हा मला नेहमीच अपराधी वाटायचे की मी तिची तुमच्याशी भेट करून देऊ शकलो नाही”
View this post on Instagram
अमिताभ यांनी राजकुमारच्या आईसाठी एक व्हिडिओ पाठवला
राजकुमार पुढे म्हणाला, “सर मला माझ्या आईसाठी काहीतरी खास करायचे होते. त्याच रात्री मी तुमच्याशी संपर्क साधला आणि तुम्हाला सांगितले. मी तुम्हाला सांगितले होते की जर तुम्ही तिच्यासाठी एक छोटा व्हिडिओ बनवला आणि मला पाठवला तर तो व्हिडिओ फक्त तुमच्या आणि तिच्यामध्येच राहील. तो कोणीही पाहणार नाही आणि मी हा व्हिडिओ आईच्या फोटोसमोर प्ले करेन.”
घडला चमत्कार
अमिताभ बच्चन यांनी लगेच राजकुमारच्या आईसाठी एक व्हिडिओ बनवला आणि तिला पाठवला. राजकुमार पुढे म्हणाले, “आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मी तो व्हिडिओ तिच्यासमोर प्ले केला आणि काही कारणास्तव तो व्हिडिओ नंतर खरोखरच पेन ड्राइव्हवरून आपोआप गायब झाला.” हे ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांना देखील आश्चर्य वाटले होते.