AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केले शोलेचे जुने तिकी; किंमत पाहून स्वतःच शॉक झाले

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काही फोटो शेअर केले आहेत त्यांनी या फोटोमध्ये त्यांना भेटायला आलेल्या लोकांचे प्रेम त्यांनी व्यक्त केलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी शोलेचं तिकीट जपून ठेवलं होतं. त्याचा फोटो शेअर करत त्याची किंमत पाहून स्वत:च आश्चर्य व्यक्त केलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केले शोलेचे जुने तिकी; किंमत पाहून स्वतःच शॉक झाले
Amitabh Bachchan Shares Photos with Fans, Shiv Temple, & Rare Sholay TicketImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 28, 2025 | 4:23 PM
Share

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये काही छान फोटो शेअर केले आहेत. यामध्ये रविवारी त्यांना पाहायला आलेल्या चाहत्यांच्या गर्दीचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. तसेच त्यांच्या या फोटोमध्ये एक शिवमंदिर देखील दिसत आहे. एवढंच नाही तर शोलेचे जुने तिकीट देखील दाखवले आहे. ज्याच्या किमतीने बिग बींनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.

बिग बींना भेटायला आलेले चाहते दर रविवारी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी असते. काही खास परिस्थिती वगळता ते नेहमीच लोकांना भेटण्यासाठी रविवारी घराबाहेर पडतात. बिग बी हे फोटो अनेकदा शेअरही करत असतात.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये अमिताभ बच्चन कलरफूल जॅकेट घातलेले दिसत आहेत. आणि ते लोकांचे स्वागत करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये काही सुंदर फोटो शेअर केली आहेत.

फोटोमध्ये लोकांची गर्दी जमलेली दिसत आहे

तसेच एका फोटोमध्ये लोकांची गर्दी जमलेली दिसत आहे आणि लोक हातात मोबाईल घेऊन अमिताभ बच्चन यांचे फोटो काढत आहेत. घराबाहेरही बॅरिकेड्स दिसत आहेत.अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या घरातील मंदिराची झलकही दाखवली आहे. त्यात शिवलिंग आणि अनेक देवी-देवता दिसत आहेत.

भगवान शिवाचा अभिषेक करताना अमिताभ बच्चन

श्रावण महिना सुरू आहे आणि बिग बी जलाभिषेक करताना दिसत आहेत. एका फोटोत ते भगवान शिवाला दुधाने अभिषेक करताना दिसत आहेत.

शोले चित्रपटाचे तिकिटे

दरम्यान या फोटोंसोबत, अमिताभ बच्चन यांनी शोलेचे जुने तिकीट शेअर केले आहे. ज्यामुळे सर्वांच्याच त्या चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या. तसेच हे तिकिट एवढं जूनं आहे की, या तिकिटावर तारीखही दिसत नाही. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे, “शोले तिकीट, ते सांभाळून ठेवण्यात आलेलं आहे”. तसेच त्यांनी प्रश्नार्थक स्वरात आश्चर्य व्यक्त केलं आणि म्हणाले की त्याची किंमत तेव्हा 20 रुपये होती. त्यांनी असेही लिहिले आहे की आजकाल थिएटरमध्ये पेयांची किंमत पण इतकी नसेल” असं म्हणत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.