Video: अंकिता लोखंडेचा ‘तो’ व्हिडीओ येताच चाहत्यांकडून अनफॉलो; कमेंट्समध्ये काय लिहलं तुम्हीच वाचा!

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Video: अंकिता लोखंडेचा 'तो' व्हिडीओ येताच चाहत्यांकडून अनफॉलो; कमेंट्समध्ये काय लिहलं तुम्हीच वाचा!

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अंकिता आणि विकीने व्हॅलेंटाईन डे शिमला येथे साजरा केला होता. विकीसोबतचे व्हॅलेंटाईनचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, सुशांतच्या चाहत्यांना अंकिता आणि विकीचे फोटो पचनी पडले नव्हते. (Ankita Lokhande’s dance video troll)

आता अंकिताने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता एका इंग्लिश गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मात्र, अंकिताच्या या व्हिडीओला जोरदार ट्रोल केलं जात आहे. काही लोकांनी लिहिले की, ‘सुशांतच्या मृत्यूनंतर ही फेमस झाली नाहीतर अगोदर हिला कुणी ओळखत नव्हतं. दुसऱ्याने लिहिले की, हिच्याकडे काही काम नाही खूपच फ्री वेळ आहे.

बिग बॉस’मध्ये जाऊन मेहनतीने स्वत:चे नाव तयार कर असाही सल्ला देण्यात आला आहे.  सुशांतच्या नावावर फेमस होण्याची शॉर्टकट पद्धत चांगली नाही, तर अनेकांनी अंकिताला अनफॉलो करत असल्याचे म्हटंले आहे. अंकिता लोखंडेने प्रपोज डेच्या दिवशी एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.

या व्हिडीओमध्ये अंकिता ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटातील ‘मनवा लागे रे’ गाण्यावर डान्स करताना दिसत होती. अंकिताने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले होते की, ‘कोणाचा तरी तू होणार आहेस, मग माझाच का नाही विकी जैन…हॅपी प्रपोज डे ‘धक-धक करने लगा’ या गाण्यावर माधुरी दीक्षित सारखा डान्स करताना दिसली होती.

अंकिताचा हा डान्स सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. मध्यंतरी सोशल मीडियावर अंकिताचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यामध्ये अंकिताने हाताला मेंहदी लावलेली होती. यामुळे चाहते असा अंदाजा लावताना दिसत होते की, अंकिताने गुपचूप मेहंदीच्या कार्यक्रम आणि रोका सेरेमनी केली आहे.

संबंधित बातम्या : 

Amitabh Bachchan Health Update : अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली, ब्लॉग शेअर करत म्हणाले…

Video : धर्मेंद्र यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत, चाहतेही म्हणाले व्वा!

Lady Gaga | लेडी गागाचे चोरी झालेले श्वान अखेर सापडले, शोधणाऱ्याला मिळाले तब्बल ‘इतके’ कोटी!

(Ankita Lokhande’s dance video troll)

Published On - 11:10 am, Sun, 28 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI