एक मराठी अभिनेत्री जिनं ओडिया सिनेमातही छाप सोडली, जिच्यासाठी नृत्य म्हणजे ऑक्सिजन

करिअरच्या शिखरावर असतानाच अर्चना (Archana Joglekar) यांनी लग्न केलं आणि त्या अमेरिकेला राहायला गेल्या. 1999 मध्ये अर्चना यांनी न्यू जर्सीमध्ये स्वत:ची नृत्यशाळा सुरू केली.

एक मराठी अभिनेत्री जिनं ओडिया सिनेमातही छाप सोडली, जिच्यासाठी नृत्य म्हणजे ऑक्सिजन
Archana Joglekar Image Credit source: Instagram/ Archana Joglekar
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 7:54 AM

सौंदर्य, नृत्यकौशल्य आणि अभिनयकौशल्याच्या जोरावर अभिनेत्री अर्चना जोगळेकर (Archana Joglekar ) यांनी 80 आणि 90चा काळ गाजवला. 1 मार्च 1965 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी मराठीसोबत ओडिया आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अर्चना या उत्तम नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याकाळी त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. अर्चना यांच्या आई आशा जोगळेकर या कथक (Kathak) नृत्यांगना आहेत. त्यांनीच अर्चनाला नृत्याचं प्रशिक्षण दिलं. अर्चना यांच्या आईने मुंबईत अर्चना नृत्यालय या नावाने डान्स स्कूल सुरू केलं. ‘संसार’ या चित्रपटातून अर्चना यांना विशेष ओळख मिळाली. त्यांनी ‘कर्मभूमी’, ‘फूलवंती’, ‘किस्सा शांती का’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. करिअरच्या शिखरावर असतानाच अर्चना यांनी लग्न केलं आणि त्या अमेरिकेला राहायला गेल्या. 1999 मध्ये अर्चना यांनी न्यू जर्सीमध्ये स्वत:ची नृत्यशाळा सुरू केली. परदेशातील विद्यार्थ्यांना त्या शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण देतात. ‘नृत्य म्हणजे माझ्यासाठी ऑक्सिजन आहे’, असं त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. (Marathi Actress)

अर्चना यांच्यासोबत घडलेला वाईट प्रसंग ओडिशामध्ये एका चित्रपटाचं शूटिंग करत असताना अर्चना यांच्यासोबत अत्यंत वाईट प्रसंग घडला. एका विकृत माणसाने अर्चना यांचा ऑटोग्राफ घेण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली. 1997 मध्ये त्या व्यक्तीला अटक झाली होता आणि 2010 मध्ये त्याला 18 महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

अर्चना या सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी त्यांना आता दिग्दर्शनाची आवड असल्याचं ते सांगतात. सध्याच्या अभिनेत्रींपैकी आलिया भट्ट ही त्यांची आवडती अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करण्याची इच्छाही त्यांनी एका मुलाखतीत बोलून दाखवली. फक्त अभिनय आणि नृत्यच नाही तर अर्चना उच्चशिक्षितही आहेत. त्यांनी वकिलीची डबल डिग्री प्राप्त केली आहे.

संबंधित बातम्या: ‘फँड्री’मधील ‘शालू’चा वजनदार लूक; फोटो पाहून तुम्हीसुद्धा व्हाल थक्क!

संबंधित बातम्या: जेव्हा वर्षा उसगांवकरांनी केलं होतं टॉपलेस फोटोशूट; झाली होती प्रचंड टीका

संबंधित बातम्या: ‘लग्नाचा खरा अर्थ तेव्हा समजतो जेव्हा..’; पतीला कॅन्सर निदान झाल्यानंतर अभिज्ञाची भावूक पोस्ट

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.