खुर्चीवर बसून हसायचे अर्चना पूरन सिंह घेते एवढे मानधन,आकडा ऐकून धक्का बसेल; एका सीझनमधूनच करोडोंची कमाई
खुर्चीवर बसून हसण्यासाठी अर्चना पूरन सिंह घेत असलेल्या मानधनाचा आकडा ऐकला तर नक्कीच धक्का बसेल. एकाच सीझनमधून तिने करोडोंची कमाई केल्याचे म्हटले जाते.

कपिल शर्मा शोमध्ये कपिल नेहमी त्याच्या को-स्टार अर्चना पूरन सिंह यांची मजा-मस्करी करताना दिसतो. अर्चनाही हे सर्व अगदीच मजेत घेते आणि तीही हे सर्व मनापासून एन्जॉय करते. कपिल गंमतीत नेहमी अर्चनाला तिच्या प्रॉपर्टीवरूनही मस्करी करताना दिसतो. पण खरचं तुम्हाला माहितीये का की अर्चाना पूरन सिंहला फक्त खुर्चीवर बसून हसायचे किती पैसे मिळतात. आकडा एकून नक्कीच तुम्हालाही आश्चर्य वाटेल.अर्चना तिच्या हास्यामुळे ती या शोमध्ये चार चाँद लावते. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले व्हिडिओ खूप पसंत केले जातात. पण खुर्चीवर बसून हसण्यासाठी अर्चना पूरन सिंह करोडोंचे मानधन घेते. एकाच सीझनमधून करोडोंची कमाई केल्याचे म्हटले जाते. अर्चना सध्या अब्जावधी संपत्तीची मालकीण आहे.
- Archana Puran Singh earns crores from Kapil Sharma show
मानधनाचा आकडा ऐकून धक्का बसेल
अर्चना फक्त खुर्चीवर बसून हसून तब्बल 8 कोटी रुपये कमावत असल्यचे म्हटले जाते.अर्चना गेल्या काही वर्षांपासून कपिल शर्माच्या शोचा भाग आहे.नवज्योत सिंग सिद्धूंनंतर तिने शोमध्ये कायमस्वरूपी तिचे स्थान निर्माण केले. कपिल शर्मा शोमधील एका एपिसोडसाठी अर्चनाला 8 लाख रुपये फी मिळते. म्हणजे एका हंगामात ती 8 कोटी रुपये कमावते. याशिवाय ती चित्रपट, कॉमेडी शो आणि सोशल मीडियातूनही भरपूर कमाई करते.
- Archana Puran Singh earns crores from Kapil Sharma show
संपत्ती अब्जोंच्या घरात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्चना पूरन सिंहची एकूण संपत्ती 235 कोटी रुपये म्हणजेच 2.35 अब्ज रुपये आहे. गेल्या अनेक सीझनपासून ती कपिल शर्मासोबत आहे. आता नवीन सीझनमध्येही तिने शोमधील आपलं स्थान मजबूत केलेलं आहे.
- Archana Puran Singh earns crores from Kapil Sharma show
अर्चनाचा मड आयलंडमध्ये एक आलिशान व्हिला आहे. ज्याची किंमत 12 कोटी रुपये आहे. या व्हिला म्हणजे एखाद्या महालापेक्षा कमी नाहीये. अर्चना ही खऱ्या आयुष्यातही अगदी राजेशाही थाटात राहते. एवढच नाही तर अर्चनाकडे महागड्या कारही आहेत.ज्यांची किंमत करोडोंमध्ये आहे.
दरम्यान अर्चनाच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर तिने तिच्या करिअरची सुरुवात एका बी-ग्रेड चित्रपटातून केली होती. तिने साकारलेली पहिली भूमिका केवळ 10 सेकंदांचीच होती, परंतु हळूहळू तिने चित्रपटांमध्ये आपलं स्थान पक्कं केलं आणि तिने बऱ्याच नावाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
- Archana Puran Singh earns crores from Kapil Sharma show
कपील शर्मा शोमध्ये अर्चना आणि कपिलची जोडी सर्वांना आवडते. त्यांची एकमेकांशी असलेली मैत्री घट्ट असून त्यांची नोकझोक प्रेक्षकांनाही आवडते. या शोमुळे कपिलची आणि अर्चनाची जोडी हीट ठरली.
