‘आश्रम’ फेम अभिनेत्री ईशा गुप्ता स्पॅनिश उद्योजकाला करतेय डेट, एग्स फ्रीज करण्याबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
Esha Gupta | स्पॅनिश उद्योजकाला डेट करतेय ईशा गुप्ता, अनेक गोष्टीत बॉयफ्रेंडने केली अभिनेत्रीला मदत.... खासगी आयुष्याबद्दल ईशा गुप्ता हिचं मोठं वक्तव्य..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा गुप्ता हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

‘आश्रम’ फेम अभिनेत्री ईशा गुप्ता कायम तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते. ईशा हिने अनेक सिनेमे आणि सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अभिनयापासून दूर आहे. आता ईशा हिने स्वतःचा मोर्चा व्यवसायाकडे वळवला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ईशा हिने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने तिचा बॉयफ्रेंड मॅन्युएल कॅम्पस गुलरसोबत लग्न आणि मुलांबद्दलही बोलले आहे.
37 वर्षांची ईशा हिने आयुष्यात आता कोणत्याही प्रकारची अडचण असल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘मॅन्युएल माझ्या आयुष्यात असल्यामुळे मला आनंद आहे. मॅन्युएल स्पॅनिश आहे. स्पेनमध्ये रेस्टॉरंट उभं करण्यात त्याने माझी मदत केली. नोकरी करत असल्यामुळे व्यवसायाबाबत विचार देखील करू शकत नव्हती.’
मी कायम विचार केले होता ती, मी अन्य कोणाच्या हाताखाली नोकरी करेल आणि मी लॉ फर्म जॉईन करेन. कारण हे सोपं आणि विश्वसनीय होतं. पण मॅन्युएल याने माझी खूप मदत केली. मी त्याला कायम बोलते तू आता मला सोडू शकत नाहीस. तुला माझ्यासोबत लग्न करावं लागेल…’ अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतर ईशा लवकरच लग्न करणार अशी चर्चा रंगली आहे.
मुलांबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मॅन्युएल याला भेटण्याआधी मी 2017 मध्ये मी एग्स फ्रिज केले होते. मॅन्युएल भेटण्यापूर्वी तीन वर्ष मी सिंगल होती. आता सर्वकाही ठिक असेल तर आम्ही लग्न करु. मी एग्स फ्रिज केले आहेत याची माहिती मॅन्युएल याला आहे आणि त्याला देखील बाबा व्हायचं आहे.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, मुलांना जन्म देण्याचा विचार केल्यानंतर IVF किंवा सरोगेसीच्या मदतीने मुलांचं जगात स्वागत करेल… जर अभिनेत्री नसती तर मी आज तीन मुलांची आई असती… असं देखील ईशा म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिची चर्चा रंगली आहे.
ईशा हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आतापर्यंत ‘राज 3’, ‘जन्नत 2’, ‘रुस्तम’, ‘बादशाहो’, ‘टोटल धमाल’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ईशा हिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
