ऐश्वर्या रायच्या वाढदिवशी कोणासोबत होता अभिषेक बच्चन? जवळच्या व्यक्तीकडून मोठी माहिती समोर

अभिषेक बच्चन बायको ऐश्वर्या रायच्या वाढदिवशी का होता शांत? कोणासोबत होता अभिनेता? घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मोठी माहिती समोर..., गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी धरलाय जोर...

ऐश्वर्या रायच्या वाढदिवशी कोणासोबत होता अभिषेक बच्चन? जवळच्या व्यक्तीकडून मोठी माहिती समोर
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 11:24 AM

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर कोणीत अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. दरम्यान, 1 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या राय हिचा वाढदिवस होता. ऐश्वर्या हिचा वाढदिवस असल्यामुळे अनेकांनी अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या. पण बच्चन कुटुंबातील एकाही सदस्याने ऐश्वर्या हिला सोशल मीडियाच्याम माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळे देखील पुन्हा अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला.

अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या रंगत असताना बच्चन कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीने दोघांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. शिवाय ऐश्वर्याच्या वाढदिवसी अभिषेत कुठे होता? यावर देखील जवळच्या व्यक्तीने मोठा खुलासा केला आहे.

रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चन याची आजी आणि जया बच्चन यांची आई इंदिरा भादुरी यांना भेटण्यासाठी अभिनेता भोपाळ याठिकाणी गेला होता. बच्चन कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, अभिषेक त्याच्या आजीसोबत राहण्यावर ठाम होता. काही दिवसांपूर्वी, इंदिरा यांचं निधन झाल्याचा माहिती समोर आली होती. पण बच्चन कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी या अफवा फेटाळून लावल्या होत्या आणि त्या जिवंत आणि निरोगी असल्याचे सांगितले होते.

रिपोर्टनुसार, बच्चन कुटुंबियांच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार अभिषेक याला आजीसोबत वेळ व्यतीत करायचा होता आणि अमिताभ बच्चन – जया बच्चन यांना त्यांच्या अन्य कमिटमेंट्स पूर्ण करायच्या होत्या. सध्या सर्वत्र बच्चन कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, अभिषेक याच्या नावाची चर्चा अभिनेत्री निम्रत कौर हिच्यासोबत रंगल्या आहेत. पण यावर अभिनेत्याने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.