Avika Gor | ‘बालिका वधू’ने गुपचूप उरकलं लग्न? सोशल मीडियावरील फोटोमुळे चर्चेला उधाण!

नुकताच अविकाने सोशल मीडियावर तिचा वधूच्या वेशातील फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो पाहून सगळ्याच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Avika Gor | ‘बालिका वधू’ने गुपचूप उरकलं लग्न? सोशल मीडियावरील फोटोमुळे चर्चेला उधाण!

मुंबई : काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘बालिका वधू’मध्ये (Balika Vadhu) छोट्या ‘आनंदी’ची भूमिका सकारात अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) घराघरांत पोहोचली. नुकताच अविकाने सोशल मीडियावर तिचा वधूच्या वेशातील फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो पाहून सगळ्याच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काही लोक तिला या पोस्टवर लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत. तर, काही लोक तिने गुपचूप लग्न केलं का?, असा प्रश्न विचारत आहेत (Balika Vadhu Fame Actress Avika Gor bride look viral on social media).

पाहा अविकाचा नववधू लूक

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

खरं तर, अविका गौरने शेअर केलेल्या फोटोत ती ख्रिश्चन वधू रुपात दिसत आहे. वराच्या हातात तिचा हात दिसत आहे. या फोटोमध्ये ती पारंपारिक पांढर्‍या लाँग वेडिंग गाऊन आणि वेल्वमध्ये दिसत आहे. तिचा हा अवतार पाहिल्यानंतर चाहते तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करत आहेत.

अविकासमोर उभ्या असलेल्या आदिलचा लुकही एखाद्या ख्रिश्चन नवऱ्याप्रमाणे आहे. तो काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये खूप देखणा दिसत आहे. या फोटोमध्ये आदिल आणि अविका एकमेकांचे हात हातात घेऊन , एकमेकांच्या डोळ्यात गुंग झालेले दिसत आहेत. हा फोटो चर्चमधील आहे.

लग्न नव्हे, येणार्‍या गाण्याची झलक!

अविकाने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘फायनली’ यानंतर, बर्‍याच ठिपक्यांनंतर बर्‍यापैकी जागा दिल्यानंतर ती खाली लिहिते, ‘कादील – स्टे ट्यून’. या पोस्टवर अविकाचा बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानी याने कमेंट करत आपण या गाण्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या दोघांनी लग्न केले नसून, ही केवळ त्यांच्या आगामी गाण्याची झलक असल्याचे म्हटले जात आहे (Balika Vadhu Fame Actress Avika Gor bride look viral on social media).

दक्षिणेत अविकाची चर्चा!

अविकाने करिअरची सुरूवात बालिका वधूच्या ‘आनंदी बहू’पासून केली होती. पण, आता ती दक्षिण इंडस्ट्रीमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत आहे. प्रसिद्ध अभिनेता नागा शौर्यबरोबर अविका काम करणार असल्याचे कळते आहे. याशिवाय ‘बालिका वधू’ ही मालिका परत येणार असल्याचीदेखील चर्चा जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत अविकाचे नाव पुढे येत आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. या मालिकेतून बाल अभिनेत्री म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात अविकाने केली होती.

फोटोशूटने चाहते घायाळ!

अविका बर्‍याचदा आपल्या नव्या फोटोंमुळे इंटरनेटवर चर्चेत असते. लॉकडाऊनमध्ये अविकाने तिच्या फिटनेसकडे बरेच लक्ष दिले आणि स्वतःचे वजन कमी केले. तिच्यातील हा बदल तिच्या नवीन फोटोंमध्ये दिसून येतो. नुकतेच तिने बिकिनी परिधान करून फोटोशूट केले होते.

(Balika Vadhu Fame Actress Avika Gor bride look viral on social media)

हेही वाचा :

Nora Fatehi | गोल्डन ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा जलवा, हॉटनेस पाहून चाहतेही झाले घायाळ!

Holi 2021 | पांढरा शर्ट पाहून लहान मुलं म्हणाली ‘होली है’, रंग पाहताच श्रद्धा कपूरने काढला पळ!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI