AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बप्पी लाहिरींचं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्याची धून हॉलिवूडमध्ये वापरलेली, कोर्टात पोहोचलेला वाद

बॉलिवूडमधील बप्पी लाहिरी यांच्या सुपरहिट गाण्याचाचे संगीत हॉलिवूडने चोरल्याची चर्चा. काही दिवसांनंतर प्रकरण ऐवढं चर्चेत आलं की थेट कोर्टात पोहोचलं प्रकरण. नेमकं काय झालं?

बप्पी लाहिरींचं प्रचंड सुपरहिट गाणं, ज्याची धून हॉलिवूडमध्ये वापरलेली, कोर्टात पोहोचलेला वाद
| Updated on: Jun 16, 2026 | 3:50 PM
Share

बॉलिवूडमध्ये अनेक अशी गाणी आहेत, जी प्रदर्शित होऊन दशकांनंतरही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. काही गाणी केवळ लोकप्रिय ठरत नाहीत तर त्यांच्याशी जोडलेल्या कथा आणि वादही तितकेच चर्चेत राहतात.

अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे ‘थोडा रेशम लगता है’. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ज्योति’ या चित्रपटातील हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र या गाण्याची खरी चर्चा तब्बल 21 वर्षांनंतर पुन्हा रंगली, जेव्हा त्याची धून हॉलीवूडमधील एका गाण्यात ऐकू आल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणाने इतके मोठे रूप घेतले की अखेर ते न्यायालयापर्यंत पोहोचले. 2002 मध्ये अमेरिकन गायिका Truth Hurts हिचे Addictive हे गाणे प्रदर्शित झाले. हे गाणे प्रदर्शित होताच अमेरिकेसह अनेक देशांमध्ये लोकप्रिय ठरले. मात्र भारतातील संगीतप्रेमींना हे गाणे ऐकताना काहीतरी संशय वाटू लागला.

कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय

गाण्याची सुरुवात आणि त्यामधील पार्श्वसंगीत ऐकल्यानंतर अनेकांना ते ‘थोडा रेशम लगता है’ या गाण्या सारखे असल्यासारखे जाणवले. काही दिवसांमध्येच याबाबत चर्चा सुरू झाली आणि हॉलीवूडच्या या गाण्यात बॉलिवूडमधील जुन्या गाण्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप होऊ लागला. ही बाब बप्पी लाहिरी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित गाणे ऐकले. गाणे ऐकल्यानंतर त्यांनाही त्यांच्या मूळ रचनेतील काही भाग परवानगीशिवाय वापरण्यात आल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी आणि संगीत हक्कधारक कंपनी Saregama यांनी या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

प्रकरण अमेरिकेतील न्यायालयात पोहोचले आणि काही काळातच ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनले. एका बाजूला बप्पी लाहिरी आणि सारेगामा यांनी कॉपीराइट हक्कांचे उल्लंघन झाल्याचा दावा केला तर दुसऱ्या बाजूला संबंधित गाण्याशी निगडित व्यक्तींनी आपली भूमिका मांडत आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला.

अनेक महिन्यांपर्यंत रंगली कायदेशीर लढाई

या वादामुळे संगीत क्षेत्रात कॉपीराइट आणि बौद्धिक संपदा हक्कांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. अनेक महिन्यांपर्यंत या प्रकरणावर चर्चा सुरू होती. संगीतकारांच्या परवानगीशिवाय त्यांच्या रचना किंवा धून वापरणे किती गंभीर ठरू शकते याचे हे एक महत्त्वाचे उदाहरण मानले गेले.

विशेष म्हणजे, या संपूर्ण वादामुळे भारतीय संगीत उद्योगालाही जागतिक स्तरावर मोठे लक्ष मिळाले. बॉलिवूडमधील एका गाण्याच्या हक्कांसाठी परदेशात इतक्या मोठ्या प्रमाणावर कायदेशीर संघर्ष झाल्याची ही त्या काळातील चर्चित घटना ठरली.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा