Bhool Bhulaiya 2 | ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी तब्बूने दिला नकार?

कार्तिक आर्यनचा आगामी 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiya 2) हा चित्रपट बर्‍याच काळापासून चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Bhool Bhulaiya 2 | 'भूल भुलैया 2' चित्रपटाच्या शूटिंगसाठी तब्बूने दिला नकार?

मुंबई : कार्तिक आर्यनचा आगामी ‘भूल भुलैया 2′ (Bhool Bhulaiya 2) बर्‍याच काळापासून चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता या चित्रपटा संदर्भात एक मोठी बातमी पुढे येत आहे. चित्रपटाच्या शूटिंगची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. मात्र, आता तब्बूने चित्रपटाच्या शूटिंगसाठी नकार दिल्याचे समजत आहे. त्यामुळे शूटिंग थांवण्यात आले आहे आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकाने भूल भुलैया चित्रपटाचे शूटिंग अनिश्चित काळासाठी तहकूब केले आहे. (Bhool Bhulaiya 2 stopped shooting)

म्हणजेच आता हे स्पष्ट झाले आहे की, लगेचच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार नाही. शूटिंगला तब्बूने नकार देण्याचे कारणही पुढे आले आहे. कोरोना काळात तब्बू शूटिंग करणार नाहीये जोपर्यंत सर्व काही व्यवस्थित होत नाही तोपर्यंत ती चित्रपटाचे शूटिंग करणार नसल्याचे तब्बूने स्पष्ट केले आहे. भूल भुलैया 2 चित्रपटामध्ये तब्बू एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे, यामुळे तब्बू शिवाय चित्रपटाचे शूटिंग करणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. भूल भुलैया’ 2007 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, अमीषा पटेल, विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसले होते. चित्रपटाला पडद्यावर प्रचंड यश मिळाले. आता चाहत्यांनाही या चित्रपटाच्या दुसर्‍या भागाकडून मोठ्या आशा आहेत.

भूलभुलैया 2 चित्रपटाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आला. पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतीमध्ये असलेला कार्तिक आर्यन हुबेहुब अक्षय कुमारप्रमाणे दिसत होता. तसेच भूलभुलैया चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षय कुमारप्रमाणे दिसत आहे. कार्तिकने अक्षयप्रमाणे रुद्राक्षाच्या माळाही घातल्या होत्या. त्यासोबतच अक्षयप्रमाणे त्याने डोक्यावर पिवळा कपडाही गुंडाळला आहे.

संबंधित बातम्या : 

आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट ओटीटीवर झळकणार!

Debut | सनी देओल लवकरच ‘या’ वेब सीरिजमध्ये दिसणार!

कुणाला बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट तर कुणाला आणखी काय… जेव्हा सेलिब्रिटीज महागडं गिफ्ट देतात!

(Bhool Bhulaiya 2 stopped shooting)

Published On - 2:58 pm, Wed, 3 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI