Bigg Boss 14 | राखी सावंत आणि रुबीना दिलैकमध्ये वाद!

'बिग बॉस 14' (Bigg Boss 14) च्या घरात कधी काय होईल याचा अंदाजा लावणे अवघड आहे. बिग बॉस 14 चा नुकताच एक प्रोमोसमोर आला आहे.

Bigg Boss 14 | राखी सावंत आणि रुबीना दिलैकमध्ये वाद!

मुंबई : ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) च्या घरात कधी काय होईल याचा अंदाजा लावणे अवघड आहे. बिग बॉस 14 चा नुकताच एक प्रोमोसमोर आला आहे. त्यामध्ये रुबीना दिलैक (Rubina Dilaik)आणि राखी सावंतमध्ये (Rakhi Sawant)  भांडणे होताना दिसत आहेत. दुपारचे जेवण बनवण्याची ड्युटी रुबीनाची होती. मात्र, रुबीना जेवण बनवायच्या अगोदरच राखी जेवण बनवत होती. हे पाहुण रुबीनाला राग येतो आणि रुबीना राखीला म्हणते की, जेवण तयार करण्याची ड्युटी माझी असताना राखी तु का बनवत आहेस त्यावर राखी म्हणते की, सर्वांना भूक लागली होती म्हणून मी बनवत होते. (Bigg Boss 14 | Argument between Rakhi Sawant and Rubina Dilaik)

त्यावर रुबीना राखीवर चिडते आणि म्हणते की, तुला सर्वांना असे दाखवायचे आहे की, तु खूप जास्त काम करते आणि मी काहीच काम करत नाही. याच विषयावर राखी-रुबीनामध्ये जोरदार हंगामा बघायला मिळाला.

बर्‍याच दिवसांपासून राखी अभिनव शुक्लाबरोबर फ्लर्ट करत आहे, परंतु काही दिवसांपासून राखीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अलीकडेच राखीने तिच्या संपूर्ण शरीरावर अभिनवचे नाव लिहिले. आज बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना एक टास्क देतात त्यावेळी अभिनव शुक्ला आणि अली गोनीमध्ये भांडणे होताना दिसत आहेत.

 

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | निक्की तांबोळी आणि रुबीना दिलैकची हात मिळवणी, अलीचा पारा चढला…

Bigg Boss 14 : विकास गुप्ताची तब्येत खालावाली, घरच्यांच्या डोळ्यात अश्रू!

Bigg Boss 14 | घरच्यांनी आणला राखीच्या नाकात दम… राखी रडून रडून बेजार!

(Bigg Boss 14 | Argument between Rakhi Sawant and Rubina Dilaik)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI