Bigg Boss 14चा आज महाअंतिम सोहळा, कोण होणार विजेता?, कसा असेल सोहळा; वाचा!

बिग बॉसच्या (Bigg Boss)  इतिहासात 2020-2021चे सीझन 140 दिवस चाचले या सीझनचे टीव्हीवर 145 भाग प्रसारित झाले आहेत.

Bigg Boss 14चा आज महाअंतिम सोहळा, कोण होणार विजेता?, कसा असेल सोहळा; वाचा!

मुंबई : बिग बॉसच्या (Bigg Boss)  इतिहासात 2020-2021चे सीझन 140 दिवस चाचले या सीझनचे टीव्हीवर 145 भाग प्रसारित झाले आहेत. यासह बिग बॉसमध्ये 23 स्पर्धेकांनी प्रवेश केला होता. काहीजण वाईल्ड कार्ड एन्ट्रीमधून आले तर काही सीनियर आणि चॅलेंजर म्हणून बिग बॉसच्या घरात आले होते. वाईल्ड कार्ड एन्ट्री करणारे आणि चॅलेंजर म्हणून या शोमध्ये दाखल झालेले कोणतेही सदस्य बिग बॉसच्या घरात टिकू शकते नाहीत. (Bigg Boss-14’s grand finale today, who will be the winner ?, how will the ceremony be)

मात्र, याला राशी सावंत अपवाद ठरली आहे, कारण राखी सावंत अजूनही बिग बॉसच्या घरात आहे. अली गोनीने देखील बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. मात्र, एकदा अली बिग बॉसच्या घरातून बेघर झाला होता. घरात जे पाच सदस्य आहेत त्यामध्ये अली गोनी देखील एक आहे. बिग बॉसच्या घरात असलेली रुबीना दिलैक ही सर्वांत प्रबळ दावेदार आहे.

कारण बिग बॉसच्या घरातमध्ये पहिल्या दिवशीपासून असलेली आणि एकदाही बाहेर न गेलेली रूबीना दिलैक आहे. तर राहुल वैद्य जो बिग बॉसच्या घरातून एकदा बाहेर जाऊन परत घरात दाखल झालेला आहे. त्यानंतर निक्की तांबोळी देखील एकदा बिग बॉसच्या घरातून एकदा बेघर झाली होती आणि परत बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे.

रुबीना दिलैक
चाहत्यांनी बिग बॉस 14 चा विजेता कोण होणार हे शोधण्याचा प्रयत्न गुगलवर केला त्यावेळी गुगलवर रुबीना दिलैकचे नाव येत आहे म्हणजेच जरी बिग बॉस 14 च्या फिनाले आज आहे. मात्र, गुगलने बिग बॉस 14 च्या विजेत्याची घोषणा आधीच केली आहे. केवळ गुगलच नाही, तर बिग बॉसच्या माजी स्पर्धकांनाही वाटते की, बिग बॉस 14 ची विजेती रुबीना दिलैक होणार, रुबीना दिलैक, तिचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्ला समवेत बिग बॉस सीझन 14 मध्ये दाखल झाली होती. आणि सर्वांनाच वाटत आहे की, बिग बॉस 14 ची विजेता रुबीना दिलैक होणार आहे.

राखी सावंत
राखी सावंतने बिग बॉसच्या घरात उशीरा एन्ट्री केली आहे. मात्र, राखी सावंत एन्ट्रीनंतरच बिग बॉस शोचा टीआरपी वाढला आहे. राखी शोमध्ये येण्याच्या अगोदर शोचा टीआरपी फक्त 1.1 असायचा पण तिच्या एंट्रीनंतर या शोची टीआरपी आता 1.9 च्या वर आहे. परंतु ट्रेंडनुसार रुबीनाचे वर्चस्व आहे. सलमान खानने आपल्या शनिवार व रविवारच्या वीकेंड वारमध्ये म्हटले होते की, शो कोणीही जिंकू शकेल. रूबीनानंतर शोमध्येची प्रबळ दावेदार म्हणून राखी सावंतकडे बघितले जाते.

निक्की तांबोळी
निक्की तांबोळी बिग बॉसच्या घरातील सर्वात चर्चेतील सदस्य राहिली. निक्कीला रूबीनाने फिनालेमध्ये पाठवले आहे. जेव्हा बिग बॉसच्या घरात काहीही वाद व्हायचे त्यावेळी निक्कीच्या बाजूने रूबीना उभी असायची. निक्की तांबोळी एकदा बिग बॉसच्या घरातून बेघर झाली होती.

राहुल वैद्य
इंडियन आयडल या गायन रिअॅलिटी शोमुळे राहुल वैद्य चर्चेत आला होता. मात्र, त्याला हा रिअॅलिटी शो जिंकता आला नाही, त्याऐवजी अभिजीत सावंत यांनी हा शो जिंकला होता. बिग बॉस 14 मध्ये राहुल आणि रूबीना दिलैकमध्ये बरेच वाद झालेले आपण पाहिले आहेत. त्या भांडणामध्ये राहुलने खालच्या पातळीला जाऊन तिच्यावर भाष्य केले होते. त्यानंतर त्याच्यावर टिकाही करण्यात आली होती. राहुल वैद्य एकदा बिग बॉसचे घर सोडून शोच्या बाहेर गेला होता आणि परत बिग बॉसच्या घरातमध्ये परतला होता.

अली गोनी
अली गोनी बिग बॉसच्या घरात जास्मीन भसीनसाठी आला होता. त्यानंतर एकदा तो बिग बॉसचा शो देखील सोडून गेला होता. सुरूवातीला अली जास्मीनसाठी खेळत होता मात्र, जास्मीन बेघर झाल्यानंतर त्याने स्वत: साठी बिग बॉसचा खेळ खेळला. अली गोनी एक बिग बॉसच्या प्रबळ दावेदार आहे.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार?, जाणून घ्या कुठे आणि कसे पाहाल ग्रँड फिनाले

Bigg Boss 14 | निक्की तांबोळी बिग बॉसवर नाराज, वाचा काय झालं!

‘बिग बॉस’ सोडून जाण्यासाठी निक्की तांबोळीला दिले 6 लाख; चाहत्यांना धक्का?

(Bigg Boss-14’s grand finale today, who will be the winner ?, how will the ceremony be)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI