जिथे न्याय मिळतो तिथेच विनयभंग, सर्वोच्च न्यायालयात अभिनेत्रीसोबत छेडछाड, धक्कादायक प्रकरण समोर
Actress Assaulted in supreme court: चांगल्या मुखवट्या आड असलेला तो विकृत माणूस... सर्वोच्च न्यायालयात अभिनेत्रीसोबत छेडछाड, धक्कादायक प्रकरण समोर... सध्या सर्वत्र अभिनेत्रीने सांगितलेल्या घटनेची चर्चा...

Actress Assaulted in supreme court: जिथे न्याय मिळतो तिथेच विनयभंग…. अभिनेत्री निमृत कौर अहलूवालिया हिच्यासोबत सर्वोच्च न्यायालयात छेडछाड झाली आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री सर्वोच्च न्यायालयात झालेल्या विनयभंगावर मौन सोडलं आहे. कॉलेजमध्ये असताना निमृत हिचा वियनभंग झाला. जी जागा सर्वात सुरक्षित समजली जाते त्याच जागेवर माझा विनयभंग झाला… असा धक्कादायक खुलासा अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला.
अभिनेत्री निमृत कौर अहलूवालिया म्हणाली, ‘सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असनाता माझा विनयभंय झाला. सुनावणी एका वरिष्ठ वकिलासोबत सुरु असताना माझी छेड काढण्यात आली. मी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात होती. एका हाय – प्रेफाईल केस प्रकरणात साक्ष देण्यासाठी मी न्यायालयात उपस्थित होती. कोर्टरुम खचाखच भरलेला होता..’
‘साक्ष देण्यासाठी उपस्थित असताना माझा विनयभंग झाला. त्या ठिकाणी मी एकटीच महिला नव्हते जिचा विनभंग झाला. एका चांगल्या मुखवट्या मागे तो विकृत माणूस होता. सर्वात आधी त्याने माझ्या पाठी नितंबांवर हात ठेवला आणि ते मला जाणवलं. गर्दी होती म्हणून मी लक्ष दिलं नाही. मागे वळून पाहिलं तर तो माणूस समोर बघत होता. तो सतत करतच होता..’
View this post on Instagram
‘अखेर मी उठली आणि दुसऱ्या ठिकाणी गेली. तो माणूस माझ्या मागे आला. त्याने माझ्या हाताला स्पर्श केला. त्याने पुन्हा माझ्या नितंबांवर स्पर्श केलं. मी घाबरले आणि माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं… तेव्हा जवळ असलेल्या महिला वकिलाच्या घडत असलेली घटना लक्षात आली.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘वकील महिलेने मला विचारलं आणि त्या माणसाकडे बोट दाखवला. त्या माणसाने वकिलाचा देखील विनयभंग केलेला.’ अशाच वकील महिने निमृतच्या त्या माणसाच्या तावडीतून सुटका केली आणि त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर अधिकाऱ्यांना सांगितलं. पोलीस मदतीसाठी धावत आले. अखेर निमृत हिने माणसाकडून लेखी माफी मागायला लावली आणि त्याला गुन्हा मान्य करायला लावला…
