ही आगाऊ कार्टी..; जान्हवीवर संतापली मेघा धाडे, सलमानचा उल्लेख करत केली थेट ही मागणी

'बिग बॉस मराठी 5'च्या घरात सतत वादविवाद होतच असतात. नुकत्याच एका एपिसोडमध्ये जान्हवी आणि वर्षा यांच्यात भांडण झालं. त्यावरून आता बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनच्या विजेतीने संताप व्यक्त केला आहे. जान्हवीविरोधात तिने पोस्ट लिहिली आहे.

ही आगाऊ कार्टी..; जान्हवीवर संतापली मेघा धाडे, सलमानचा उल्लेख करत केली थेट ही मागणी
Janhavi Killekar, Salman Khan and Riteish DeshmukhImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 3:07 PM

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन अगदी पहिल्या एपिसोडपासूनच गाजतोय. प्रत्येक सिझनप्रमाणे यंदाही बिग बॉसच्या घरात दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांमध्ये सतत भांडणं, वादविवाह होत असतात. नुकत्याच एका एपिसोडमध्ये अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात कडाक्याचं भांडण झाल्याचं पहायला मिळालं. या भांडणादरम्यान जान्हवी वर्षा उसगांवकरांना बरंवाईट बोलते. त्यावरून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहित जान्हवीला घराबाहेर काढण्याची मागणी केली आहे.

भांडणादरम्यान जान्हवी वर्षा यांना म्हणते, “फालतूची ओव्हरअॅक्टिंग करू नका. त्यांना आता पश्चात्ताप होत असेल की यांना आपण का पुरस्कार दिले? कारण बाहेर अनेक चांगले अभिनेते आहेत. त्यांना पुरस्कार मिळाले नाहीत. पण तुम्हाला दिलाय.” मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकाराचा जान्हवीकडून हा अपमान पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेनं जान्हवीविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

मेघा धाडेची पोस्ट-

‘माझ्या लाडक्या बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनो, ही आगाऊ कार्टी जान्हवी नॉमिनेशनला आलीच तर तिला सोडू नका. तिला बाहेरचा रस्ता नक्की दाखवा, ही माझी कळकळीची विनंती आहे. बिग बॉस मराठीची सर्वांत वाईट स्पर्धक, जान्हवी किल्लेकर’, असं तिने एका पोस्टमध्ये म्हटलंय. तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने सूत्रसंचालक रितेश देशमुखकडे खास मागणी केली आहे. ‘मला अजूनही आठवतंय की हिंदी बिग बॉसमध्ये सलमान खान सरांनी प्रियांका जग्गा आणि स्वामी ओम यांना चुकीच्या वागणुकीबद्दल घरातून बाहेर काढलं होतं. आता आम्हाला रितेश देशमुख सरांकडूनही ही अपेक्षा आहे. तुम्ही याबद्दल नक्की काहीतरी बोला. जान्हवी किल्लेकरचं असं वागणं अत्यंत चुकीचं आहे. रितेश सर, प्लीज तिला बाहेर हाकलून द्या. आम्हाला असे लोक घरात नको आहेत,’ असं तिने लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

कोण आहे जान्हवी किल्लेकर?

जान्हवी ही छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये खलनायकी भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिने ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत सानियाची भूमिका साकारली होती. ‘श्री स्वामी समर्थ’ या मालिकेतही तिने काम केलंय.

खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा
बापच बाजी मारणार, आत्रामांच्या मुलीचा पवार गटात प्रवेश अन् कोणाचा दावा.
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?
लाडक्या गौरी-गणपती बाप्पाला आज निरोप देताना पाऊस कोसळणार?.
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य
महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीवर काही शिजतंय? शिंदेंच्या नेत्याचं वक्तव्य.
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल
पण आम्ही पवार साहेबांच्या लेखी वाईट, दादांच्या समर्थकाचं पत्र व्हायरल.