घाण्याच्या कार्यक्रमात सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचा भन्नाट डान्स, पहा व्हिडीओ
'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण त्याच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. येत्या 29 नोव्हेंबर रोजी तो संजनाशी लग्न करणार आहे. संजनाच्या घाण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. तिच्या डान्सचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सूरजच्या लग्नापूर्वीच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर त्याच्या केळवणाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. अशातच सूरजची होणारी पत्नी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. तर त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव संजना असं आहे. येत्या 29 नोव्हेंबरला हे दोघं लग्न करणार आहेत. यापूर्वी संजनाच्या घाण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात तिने धमाल डान्ससुद्धा केला आहे. या डान्सच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
घाण्याच्या कार्यक्रमासाठी संजनाने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर पारंपरिक दागिने आणि केसात गजरा माळून तिने हा धमाल डान्स केला आहे. संजना आणि सूरजचं हे लव्ह मॅरेज आहे. चुलत मामाच्या मुलीशीच सूरज लग्न करतोय. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थात अंकिता वालावलकरने सूरज आणि संजनाचं धूमधडाक्यात केळवण केलं होतं. संजनासाठी तिने खास पुरी-भाजीचा बेत केला होता. यावेळी सूरजने खास उखाणासुद्घा घेतला होता. “बिग बॉस जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न.. संजनाचं नाव घेतो आता करेन लग्न”, असा उखाणा तो घेतो.
View this post on Instagram
सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व गाजवलं होतं. या शोचं विजेतेपद पटकावल्यानंतर तो ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बिग बॉसनंतर सूरजची सर्व स्वप्नं हळूहळू पूर्ण होताना दिसत आहेत. आधी त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, त्यानंतर आपलं हक्काचं घरदेखील बांधलं. बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यानंतर गावात हक्काचं घर बांधण्याची सूरजची इच्छा होती. या घराच्या बांधकामाचा व्हिडीओ त्याने चाहत्यांसोबत शेअर केला होता. आता घराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही त्याने गृहप्रवेशाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील कमेंट केली होती. सूरजच्या आयुष्यातील या नव्या टप्प्याबद्दल चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
