ऐश्वर्या राय हिला बघताच चाहत्यांना बसला थेट धक्काच, ते फोटो व्हायरल, अभिनेत्रीने..
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे खास फोटो आणि व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ऐश्वर्या रायने मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. नुकताच अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल झाली आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सतत चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग आहे. मोठा काळ ऐश्वर्याने चित्रपटांमध्ये गाजवला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. मात्र, यावर अभिषेक किंवा ऐश्वर्या यांनी भाष्य केले नाही. काही दिवसांपूर्वीच आंध्र प्रदेशच्या एका कार्यक्रमात ऐश्वर्या पोहोचली होती. यादरम्यान तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडून आर्शिवाद घेतले. ऐश्वर्या राय हिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. नुकताच ती एका कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी तिचा लूक पाहून लोकांना मोठा धक्का बसला. ऐश्वर्या आपला लूक पूर्णपणे बदलला असून वजनही कमी केले. सध्या ऐश्वर्या राय सऊदी अरेबियात आहेत.
साैदी अरेबियात 4 डिसेंबरपासून रेड सी फिल्म फेस्टिवल सुरू झाले. ज्याच्यासाठी ऐश्वर्या राय पोहोचले आहे. ऐश्वर्या राय हिने काही खास फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहेत. या फोटोमध्ये तिचा लूक जबरदस्त दिसत आहे. ऐश्वर्याने ब्लॅक बॉडी फिटेड साटिन गाऊन घातला आहे. एमरेल्ड डायमंड नेकलेस तिने घातला. ऐश्वर्या राय हिला बघितल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की, ती अगोदरच्या तिच्या शेपमध्ये आली आहे. यावर अभिनेत्रीने कोणतेच भाष्य केले नाहीये.
ऐश्वर्या राय हिने वजन खूप जास्त कमी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. ऐश्वर्याचा लूक पूर्वीसारखा दिसत आहे. मात्र, साैदी अरेबियाला जाताना अभिनेत्री स्पॉट झाली नाही. ऐश्वर्या ही एकटीच गेल्याचे सांगितले जातंय. यावेळी ऐश्वर्यासोबत आराध्या गेली नसल्याचे दिसतंय. विदेशात जाताना कायमच ऐश्वर्या मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन जाते. ऐश्वर्या अधिक वेळ मुलीसोबत घालवताना दिसते.
View this post on Instagram
गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात सर्वकाही व्यवस्थित सुरू नसल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर दोघे घटस्फोट घेणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. त्यामध्येच एक पुरस्कार मिळाल्यानंतर ऐश्वर्याबद्दल बोलताना अभिषेक बच्चन दिसला. बच्चन कुटुंबासोबत ऐश्वर्या राय स्पॉट होत नसल्याने घटस्फोटाच्या चर्चांना अधिक उधाण आले.
