इतका नग्न, निर्लज्ज माणूस आजपर्यंत…, रणबीर कपूर बद्दल प्रसिद्ध अभिनेत्याने असं का म्हटलं?
Actor Ranbir Kapoor : इतका नग्न, निर्लज्ज माणूस आजपर्यंत..., रणबीर कपूर याच्याबद्दल इतकं मोठं विधान करणारा अभिनेता आहे तरी कोण, असं का म्हणाला? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणबीर कपूर हिची चर्चा...

Actor Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता देखील रणबीर याच्याबद्दल अभिनेत्याने मोठं विधान केलं आहे. ज्यामुळे अभिनेता रणबीर याच्याबद्दल असं काय म्हणाला ज्यामुळे चर्चा सुरु झाल्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. रणबीर कपूर इतका नग्न आणि निर्लज्ज माणूस आजपर्यंत पाहिला नाही… असं वक्तव्य अभिनेत्याने केलं आहे. असं वक्तव्य करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही कर, पियूष मिश्रा आहे.
सांगायचं झालं तर, पियूष मिश्रा याने रणबीर कपूर याच्या विरोधात नाही तर, अभिनेत्याचं कौतुक करत त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. पियूष म्हणाला, ‘रणबीर कपूर इतका नग्न आणि निर्लज्ज माणूस आजपर्यंत पाहिला नाही… रणबीर त्याचं काम पूर्ण करतो आणि त्यानंतर सेटवर सर्वांसोबत बोलत असतो… त्यांची गोष्टी अशा असतात की मी काहीच बोलू शकत नाही… तो खूप दयाळू आणि अद्भुत कलाकार आहे. या पिढीत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही.’
रणबीर कपूर कपूरचा वारसा खांद्यावर घेत नाहीये.
पुढे पियूष मिश्रा म्हणाला, रणबीर एक हुशार अभिनेता आहे. तो या पिढीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहे, जो सीन सुरू होताच भुमिकेत शिरतो आणि कॅमेरा बंद असताना तो लोकांसोबत मजा करत असतो. त्याची स्विच ऑन आणि ऑफ करण्याची पद्धत फार वेगळी आहे… फार कमी अभिनेते असं करु शकतात… जेव्हा तो भूमिकेत नसतो… तेव्हा तो आनंद साजरा करतो…
तो कपूरचा वारसा आपल्या खांद्यावर घेऊन चाललेला नाहीये. त्याचे वडील खूप मोठे कलाकार होते, त्याचे आजोबा चित्रपटसृष्टीचे जादूगार होते आणि त्याचे पणजोबा देखील एक प्रसिद्ध अभिनेते होते, पण तो स्वतःचं काम करत आहे. तो त्यांचा भार वाहून नेत नाहीये.” असं देखील अभिनेता म्हणाला.
रणबीर कपूर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो… रणबीर याने अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत लग्न केलं आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांना एक मुलगी देखील आहे. तिचं नाव राहा असं आहे… रणबीर सोश ल मीडियावर सक्रिय नसला तरी, सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
