AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! संजय दत्तचा यूकेचा व्हिसा नाकारला, ‘ती’ गोष्ट भोवली, चाहते प्रचंड भडकले; ब्रिटिश सरकारवर आगपाखड सुरू

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा चित्रपटांमध्ये कायमच धमाका करताना दिसतो. संजय दत्तची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळतंय. नुकताच आता संजय दत्त याला व्हिसा नाकारण्यात आलाय. यामुळे मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळतंय. आता यावर बोलताना संजय दत्त हा दिसला आहे.

सर्वात मोठी बातमी ! संजय दत्तचा यूकेचा व्हिसा नाकारला, 'ती' गोष्ट भोवली, चाहते प्रचंड भडकले; ब्रिटिश सरकारवर आगपाखड सुरू
Sanjay Dutt
| Updated on: Aug 09, 2024 | 2:01 PM
Share

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून संजय दत्तचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही संजय दत्त चांगलाच सक्रिय दिसतो. संजय दत्तचा चाहतावर्गही मोठा आहे. फक्त अभिनयच नाही तर संजय दत्तचे खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिले आहे. नुकताच आता संजय दत्त याने यूकेचा व्हिसा रद्द होण्याच्या प्रकरणावर भाष्य केले आहे. फक्त हेच नाही तर याबद्दल त्याने काही मोठे खुलासे देखील केले आहेत. यूकेचा व्हिसा रद्द झाल्याने ‘सन ऑफ सरदार 2’ चित्रपटाच्या शूटिंगपासून दूर राहण्याचीही वेळ त्याच्यावर आलीये. आता संजय दत्त याच्या खुलाशानंतर चाहते हे यूकेच्या सरकार विरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत. 

संजय दत्त म्हणाला की, मुळात म्हणजे ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी जे गेले ते अत्यंत चुकीचे आहे. मला सुरूवातीला व्हिसा हा देण्यात आला. व्हिसा मिळाल्यामुळे तिथे माझे सर्व बुकिंग आणि प्लनिंग केले गेले. त्यानंतर त्यांंनी एका महिन्यानंतर माझा व्हिसा हा रद्द केला. मी त्यांना माझी सर्व आवश्यक असलेली कागदपत्रे दिली होती. जर त्यांना मला व्हिसा द्यायचा नव्हता तर पहिल्यांदा का दिला?

त्यांना त्यांच्या देशातील सर्व नियम हे व्हिसा दिल्यानंतर एक महिन्याने आठवले. मला वाटत नाही की, माझ्याकडून काही राहिले आहे. त्या ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी जे केले ते चुकीचे आहे. मुळात म्हणजे मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. मी फक्त माझ्याच नाही तर मी प्रत्येक देशाच्या कायद्याचे पालन करतो. त्यामुळेच मला हे समजू शकले नाही की, हे सर्व का घडले. 

संजय दत्त याने केलेल्या या खुलाशानंतर ब्रिटिश सरकारवर लोक भडकले आहेत. संजय दत्त याला व्हिसा नाकारण्याचे कारण तसे जुने आहे. हे सर्व प्रकरण 31 वर्षे जुन्या प्रकरणाशी संबंधित आहे. 1993 मध्ये संजयला टाडा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. मुंबई बॉम्बस्फोटातील इतर आरोपींकडून खरेदी केलेली बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याबद्दल नंतर शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले.

हेच नाही तर यामुळेच त्याला काही वर्ष जेलमध्ये राहण्याची वेळ देखील आली.  2016 मध्ये संजय दत्त याने आपली शिक्षा पुर्ण केली. जेलची शिक्षा पूर्ण केल्यानंतर संजय दत्त हा चित्रपटांमध्ये परत एकदा सक्रिय झालाय. आता त्या प्रकरणामुळेच संजय दत्तला व्हिसा नाकारण्यात आलाय. मात्र, या प्रकरणानंतर संजय दत्त याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड असा संताप बघायला मिळतोय.

मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.