वयाच्या तीन वर्षांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेकची लेक करत आहे ‘हे’ काम, मोठा खुलासा करत अभिनेत्रीने…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. मात्र, ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील वाद टोकाला गेल्याचेही सांगितले जाते. ऐश्वर्या ही सतत विदेशात जाताना देखील दिसत आहे. अनंत अंबानीच्या लग्नात बच्चन कुटुंबासोबत न सहभागी होता ऐश्वर्या मुलीसोबत लग्नात दाखल झाली. दुसरीकडे सर्व बच्चन कुटुंब एकत्र आले. अनंत अंबानीच्या लग्नानंतर लगेचच ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिला घेऊन विदेशात निघाली, दुसरीकडे अभिषेक बच्चन त्यावेळी मुंबईतच होता. अभिषेक बच्चन याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. घटस्फोटाच्या चर्चांवर ऐश्वर्या राय हिने देखील काहीच भाष्य केले नाहीये.
ऐश्वर्या राय हिच्यासोबत कायमच आराध्या स्पॉट होताना दिसते. ऐश्वर्या राय हिने एका मुलाखतीमध्ये मुलगी आराध्या हिच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ऐश्वर्या राय हिने थेट म्हटले की, आराध्या हिला मेकअप करण्यास प्रचंड आवडतो. हेच नाही तर वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ती स्वत:चा मेकअप करते.
मी जेंव्हाही बाहेर जाते, त्यावेळी मी तिच्यासमोरच मेकअप करते. मी तिला सांगते की मी ऑफिसला जात आहे. त्यानंतर मी ज्यावेळी परत येते, त्यावेळी ती मेकअप काढताना मला बघते. आराध्यासा मेकअप करायला खूप आवडतो. पहिल्यांदाच ऐश्वर्या राय ही लेकीबद्दल असा खुलासा करताना दिसली होती. अनंत अंबानीच्या लग्नात आराध्या ही खास लूकमध्ये पोहोचली होती.
विशेष म्हणजे अनंत अंबानीच्या प्री वेडिंग फंक्शनमधील आराध्याचा लूक चाहत्यांना जबरदस्त आवडला. आराध्या बच्चनच्या एकाच हेअर स्टाईलमुळेही लोक कायमच ऐश्वर्या राय हिला सुनावत असत. काही दिवसांपूर्वीच आराध्या बच्चन ही वेगळ्या हेअर स्टाईलमध्ये दिसली. मध्यंतरी चर्चा होती की, ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन तिच्या आईच्या घरी शिफ्ट झालीये.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वादाला श्वेता बच्चन ही कारणीभूत असल्याचेही सांगितले जाते. श्वेता बच्चन ही जलसा बंगल्यात राहण्यास आल्याचे ऐश्वर्याला अजिबात पटले नसल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच प्रतिक्षा हा बंगला श्वेता बच्चनच्या नावावर केलाय. श्वेता बच्चन हिचा लेक आणि अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदा याने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.
