ऐश्वर्या राय या व्यक्तीच्या आठवणीत प्रचंड भावूक, थेट तो फोटो शेअर करत म्हणाली, आपली…
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने नुकताच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्री भावूक झाल्याचे बघायला मिळतंय. तिने काही फोटोही शेअर केली आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत असणारे नाव आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. काही दिवसांपूर्वीच आंध्र प्रदेश येथे श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला ऐश्वर्या पोहोचली होती. यावेळी आपल्या भाषणातून तिने मोठा संदेश दिला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडतानाही ऐश्वर्या दिसली. आता ऐश्वर्या राय चांगलीच भावूक झाल्याचे बघायला मिळतंय. मागील काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर मध्यंतरी सांगितले गेले की, ऐश्वर्याने अभिषेकचे घर सोडले. ऐश्वर्या रायने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून ती भावूक होताना दिसतंय. कधीही सोशल मीडियावर व्हायरल न झालेली फोटो तिने शेअर केली.
ऐश्वर्याने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त भावनिक पोस्टसह काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये आराध्या बच्चनही दिसत आहे. ऐश्वर्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय बाबा-अज्जा… पालक देवदूत. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो… आपली आराध्या 14 वर्षांची झालीये… तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद. तुमच्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादांबद्दल खरोखरच आम्ही आभारी आहोत.
ऐश्वर्या राय हिने काही फोटो शेअर केली आहेत. त्यामधील एका फोटोमध्ये लहान आराध्या आजोबांच्या कडेवर दिसत असून आई ऐश्वर्याही शेजारी उभी आहे. आराध्याचे लाड करताना आजोबा दिसत आहे. हा फोटो शेअर करत ऐश्वर्या राय खूप जास्त भावूक झाल्याचे बघायला मिळतंय. 2017 मध्ये ऐश्वर्याच्या वडिलांचे निधन झाले. बराच काळ ते आजारी होते. ऐश्वर्या तिच्या वडिलांच्या अत्यंत जवळ होती. वडिलांच्या आठवणीत तिने ही खास पोस्ट शेअर केली.
View this post on Instagram
नुकताच ऐश्वर्याची लेक आराध्या हिचा वाढदिवस झाला. अमिताभ बच्चन यांनी नातीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. नातीला शुभेच्छा देताना अमिताभ बच्चन भावूक झाले होते. कायमच आराध्या आई ऐश्वर्यासोबत फिरताना दिसते. काही दिवसांपूर्वीच मायलेकी विदेशात जाताना स्पॉट झाल्या होत्या. आता ऐश्वर्याच्या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
