धर्मेंद्र यांच्या संपत्तीवर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, कोणाला आणि कशी मिळणार 450 कोटींची मालमत्ता
Hema Malini on Dharmendra Property : धर्मेंद्र यांच्या 6 मुलांमध्ये कोणाला आणि कशी मिळणार 450 कोटींचा मालमत्ता, पतीच्या संपत्तीवर हेमा मालिनी यांचं लक्षवेधी वक्तव्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या प्रॉपर्टीची चर्चा...

Hema Malini on Dharmendra Property : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला. 24 नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. पण आता धर्मेंद्र यांच्या 450 कोटींच्या संपत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांना 6 मुलं आहेत. त्यामुळे कोणाला आणि कशी संपत्ती मिळणार यावर प्रश्नचिन्ह आहे… सांगायचं झालं तर, पहिली पत्नी असताना दुसरं लग्न हिंदू धर्माच्या विरोधात आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला आणि हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर हेमा मालिनी यांनी ईशा आणि अहाना या दोन मुलींचं जगात स्वागत केलं. पण धर्मेंद्र आधीच विवाहित असून चार मुलांचे वडील होते…
धर्मेंद्र यांच्या संपत्तीवर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य…
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये समाजाच्या विरोधात जात लग्न केलं… ज्यामुळे हेमा मालिनी यांना टीकेचा सामना देखील करावा लागला. पण धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी सर्वांकडे दुर्लक्ष करत फक्त स्वतःच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं. एवंढच नाहीतर, आजपर्यंत हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या घराची पायरी देखील चढलेल्या नाहीत. शिवाय धर्मेंद्र यांच्या शोकसेभत देखील त्या दिसल्या नाहीत.
पण धर्मेंद्र यांच्यासोबत संसार थाटल्यानंतर हेमा मालिनी यांनी त्यांच्या संपत्तीबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘मला माहिती होतं, आमच्या लग्नानंतर अनेक समस्या उभ्या राहतील… मला त्यांच्या प्रेमाशिवाय मला दुसरं काहीच नको होतं… जेव्हा जेव्हा मला त्यांची (धर्मेंद्र) गरज भासली तेव्हा – तेव्हा ते माझ्या बाजूने उभे राहिले… मला त्यांचा पैसा, प्रॉपर्टी काहीही नको… फक्त थोड्या प्रेमाची गरज आह … बाकी मला काहीही नको..’ असं हेमा मालिनी म्हणाल्या होत्या.
कोणाला मिळणार धर्मेंद्र यांची संपत्ती?
धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर की हेमा मालिनी यांच्यापैकी कोणाला धर्मेंद्र यांची संपत्ती मिळणार? तर कायद्यानुसार. हिंदू विवाह कायद्यानुसार, पहिल्या पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतरच दुसरा विवाह वैध मानला जातो. अन्यथा, दुसरा विवाह अवैध मानला जातो. पण, अशा प्रकरणांमध्ये, कायदा दोन्ही विवाहांपासून होणाऱ्या मुलांना वडिलांच्या मालमत्तेत समान हक्क देतो. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, धर्मेंद्र यांची मालमत्ता त्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या पत्नीला नाही, परंतु अभिनेत्याने त्यांच्या सहा मुलांमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल.
धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नींच्या बाबतीत, परस्पर संमतीनं मालमत्तेचं विभाजन शक्य आहे. कारण हिंदू विवाह कायद्यानुसार, पहिली पत्नी जिवंत असताना घटस्फोटाशिवाय दुसरा विवाह वैध मानला जात नाही. अशा परिस्थितीत, प्रकाश कौर आणि हेमा मालिनी परस्पर संमतीने मालमत्तेचे विभाजन करू शकतात. असं देखील सांगितलं जात आहे.
