जान्हवी कपूरला धक्काबुक्की, मुंबईत अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही कयमच चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून अभिनेत्री ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. दोघे कायमच एकत्र स्पॉट होताना दिसतात. सध्या जान्हवी तिच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. मात्र, जान्हवी कपूरसोबत धक्कादायक प्रकार घडलाय.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्यासोबत धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. जान्हवी सध्या तिच्या आगामी परस सुंदरी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतंय. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी मुंबईतील एका दहीहंडी कार्यक्रमात जान्हवी पोहोचली होती. यावेळी मराठीमध्ये ती चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसली आणि परम सुंदरी चित्रपट पाहण्यास सांगताना ती दिसली. तिने दहीहंडी देखील फोडली. मात्र, जान्हवी कपूर हिला भेटण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. ज्यावेळी जान्हवी ही स्टेजवरून उतरून आपल्या गाडीकडे निघाली तेव्हा लोकांनी तिच्याभोवती मोठी गर्दी केली.
जान्हवी कपूरचे सुरक्षारक्षक हे गर्दीमधून मार्ग काढत तिला घेऊन जात होते. मात्र, यावेळी लोकांची संख्या खूप जास्त असल्याने तिच्या सुरक्षारक्षकांची फजिती उडाली. यावेळी लोकांनी मोठी गर्दी केली आणि जान्हवी कपूरला धक्काबुक्की देखील झाली. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, जान्हवी कपूर हिने धैर्य राखत गर्दीतून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न केला. चाहते हे तिच्यासोबत फोटो घेण्यासाठी जवळ येत होते.
गर्दीतून मार्ग काढत शेवटी जान्हवी कपूरला बाहेर काढण्यात आले आणि तिला गाडीमध्ये बसवण्यात आले. मात्र, यावेळी अभिनेत्रीला धक्काबुक्की झाली. जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. दोघे कायमच एकत्र फिरताना दिसतात. हेच नाही तर बोनी कपूर हे देखील शिखर पहाडिया याच्यासोबत काही दिवसांपूर्वीच विमानतळावर स्पॉट झाले होते. जान्हवी आणि शिखर पहाडिया हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया हा आहे. शिखर पहाडिया याचा भाऊ देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करतोय. अनंत अंबानीच्या लग्नात धमाल करताना शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर दिसले होते. पूर्ण कपूर कुटुंबियांना जावई म्हणून शिखर हा पसंत असल्याचे सांगितले जाते. मात्र, दोघांनीही त्यांच्या रिलेशनवर अजून भाष्य केले नाहीये. शिखर पहाडिया हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. जान्हवी सध्या तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात बिझी दिसत आहे.
