अखेर मौनी रॉय हिने केला ‘त्या’ गोष्टीवर अत्यंत मोठा खुलासा, म्हणाली, लोकांनी…
अभिनेत्री मौनी रॉय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. मौनी रॉयने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केली. त्यानंतर मौनी रॉयने आपल्या करिअरमध्ये परत कधी मागे वळून बघितले नाही. मुळात म्हणजे मौनी रॉय ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.

अभिनेत्री मौनी रॉय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मौनी रॉयची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांनी केलीये. नागिन मालिकेत धमाकेदार भूमिका करताना मौनी रॉय दिसली. यानंतर मौनी रॉय हिचे नशीब बदलले आणि तिला थेट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मौनी रॉय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. मौनी रॉय ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. मौनी रॉय सोशल मीडियावरही सक्रिय असते.
मौनी रॉय ही काही दिवसांपूर्वीच विदेशात खास वेळ पतीसोबत घालवताना दिसली. पतीच्या वाढदिवसानिमित्त ती विदेशात गेली होती. काही दिवसांपूर्वी मौनी रॉय ही आजारी पडली होती. यावेळी मौनी रॉय हिने हॉस्पिटलमधील फोटोही शेअर केले. मौनी रॉय हिच्या या फोटोनंतर चाहते तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसले.
आता मौनी रॉय हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना मौनी रॉय ही दिसलीये. मौनी रॉय म्हणाली की, मला नेहमीच म्हटले जायचे की, तू काही खूप सुंदर नाहीस. मी ज्यावेळी मुंबईमध्ये आले, त्यावेळी मला नेहमीच म्हटले जात होते की, तू अभिनेत्री बनण्यासारखी नाहीस.
मुळात म्हणजे आता मला काही गोष्टी कळतात, त्यावेळी माझ्यासाठी हे अवघड होते, कारण मी 19 वर्षाची होते. त्यावेळी मला या गोष्टींचा प्रचंड त्रास होत होता. मी खूप रडत असत. मी ज्या ठिकाणाहून आले, ज्या कुटुंबातून आले तेंव्हा माझ्यासाठी या सर्व गोष्टी खूप जास्त वेगळ्या होत्या. मला फक्त हे माहिती होते की, मला पुढे जायचे आहे.
मी एका वेगळ्याच जगातून आले होते. मला मेकअप काय हे पण माहिती नव्हते. त्यानंतर मी काही गोष्टी शिकल्या आणि पुढे गेले. लोकांना जे काही बोलायचे ते बोलतील…पण मी स्वत: वर प्रेम केले. मी खरोखरच देवाचे धन्यवाद मानते की, त्यांनी मला ते विचार करण्याची बुद्धी दिली. आता मौनी रॉय हिच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
