अब्जाधीशाला घटस्फोट, अभिनेत्यासोबत थाटला दुसरा संसार, पहिला नवऱ्यासोबत अत्यंत भयानक होतं निलम कोठारीचं आयुष्य
Neelam Kothari Birthday: पहिल्या नवऱ्यासोबत भयानक होतं नीलम कोठारी हिचं वैवाहिक आयुष्य, अब्जाधीशाला घटस्फोट देत अभिनेत्रीने बॉलिवूड अभिनेत्यासोबत थाटला दुसरा संसार... सध्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची रंगतीयं सर्वत्र चर्चा...

Neelam Kothari Birthday: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर दुसरा संसार थाटला आणि आज त्या आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. असंच काही अभिनेत्री नीलम कोठारी हिच्यासोबत देखील झालं आहे… 55 वर्षांच्या नीलम हिने 25 वर्षांपूर्वी ऋषी सेठी नावाच्या अब्जाधीशाशी लग्न केलं होतं. पण अभिनेत्री पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. अशात नीलम हिने घटस्फोटाचा निर्णय घेत, करीयरकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. पण 2011 मध्ये नीलम हिने अभिनेता समिर सोनी याच्यासोबत लग्न केलं.
नीलम हिने खासगी आयुष्यात अनेकदा चढ – उतारांचा सामना केला. करीयरच्या सुरुवातील नीलम हिचं नाव अभिनेता गोविंदा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांचं नातं लग्नापर्यंत देखील पोहोचलं होतं… पण असं काहीही झालं नाही.. तर जाणून घ्या नीलम हिच्या खासगी आयुष्यातील काही किस्से…
पहिल्या लग्नात नीलम हिने अनेक समस्यांचा सामना करावा लागला…एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितल्यानुसार, लग्नानंतर नीलम हिच्यावर नाव बदल्यासाठी दबाव टाकण्यात आला. एवढंच नाही तर, नॉन-व्हेज देखील अभिनेत्रीला खाऊ दिलं जात नव्हतं… शिवाय वेस्टर्न कपड्यांवर देखील बंदी होती. संसार टिकावा म्हणून अभिनेत्री नवऱ्याच्या सर्व अटी मान्य देखील केल्या… अभिनेत्री स्वतःचं नाव बदलण्यासाठी देखील तयार झाली होती. पण एक वेळ अशी आली जेव्हा अभिनेत्रीला वाटलं आपली ओळख पुसली जात आहे…तेव्हा नीलम हिली ऋषी सेठिया याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला..
नीलमचं पहिलं लग्न झालेलं 2000 मध्ये…
नीलम कोठारी हिने 2000 मध्ये पहिलं लग्न ब्रिटनमधील उद्योगपती ऋषी सेठिया यांच्याशी केलं. लग्नानंतर लगेचच दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नीलम हिने 2011मध्ये अभिनेता समीर सोनीशी लग्न केलं. 2013 मध्ये दोघांनी अहाना नावाची मुलगी दत्तक घेतली.
नीलम आणि गोविंदा
1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इल्जाम’ सिनेमातील नीलम आणि गोविंदा यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेवलं हेतं. तेव्हा अभिनेत्रीने गोविंदा याच्यासोबत जवळपास 14 सिनेमांमध्ये काम केलं. असं देखील म्हणतात की, नीलम आणि गोविंदा यांच्यामध्ये प्रेम बहरलं होतं… रिपोर्टनुसार, दोघांचं लग्न देखील होणार होतं …
नीलम हिच्या प्रेमाखातर गोविंदा याने सुनीता हिच्यासोबत झालेला साखरपुडा देखील मोडला. गोविंदाच्या आईची इच्छा होती की त्याने दिग्दर्शक आनंद सिंगची मेहुणी सुनीता हिच्याशी लग्न करावं. गोविंदाने कधीही त्याच्या आईची आज्ञा मोडली नाही. आईच्या दबावाखाली त्याने नीलमशी असलेलं नातं तोडलं आणि सुनीता हिच्याशी लग्न केलं.
