AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1-2 नव्हे प्रियांकाने विकले तब्बल 4 फ्लॅट्स, देसी गर्लला किती कोटींचा फायदा?

सुमारे सात वर्षांपूर्वी भारत सोडून अमेरिकेत स्थायिक झालेल्या प्रियांका चोप्राने तिची चार घरे एकत्र विकली आहेत. मुंबईतील ओबेरॉय स्काय गार्डनमध्ये तिचे एक-दोन नव्हे तर चार आलिशान अपार्टमेंट होते.

1-2 नव्हे प्रियांकाने विकले तब्बल 4 फ्लॅट्स, देसी गर्लला किती कोटींचा फायदा?
प्रियांका चोप्राImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 07, 2025 | 12:55 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतील, बॉलिवूडमधील ‘देसी गर्ल’ अर्थात प्रियांका चोप्रा हिची गणना इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या आणि श्रीमंत अभिनेत्रींमध्ये केली जाते. चित्रपटांव्यतिरिक्त, प्रियांका ही ब्रँड एंडोर्समेंट आणि गुंतवणूकीतूनही चांगली कमाई होते. या अभिनेत्रीने आता अमेरिकेत बसून भारतात करोडो रुपयांची डील केली आहे. प्रियांका चोप्राने मुंबईतील तिचे 1 -2 नव्हे तब्बल 4-4 फ्लॅट्स विकून कोट्यवधींची कमाई केली आहे.

एका रिपोर्टनुसार, प्रियांका चोप्राने मुंबईतील तिचे चार अपार्टमेंट एका कुटुंबाला विकले आहेत. यातून अभिनेत्रीला 16 कोटींपेक्षा जास्त नफा झाला आहे. हा व्यवहार 3 मार्च 2025 रोजी झाला. सचदेवा कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांनी ही मालमत्ता खरेदी केली आहे.

किती कोटींमध्ये झाली डील ?

रिपोर्टनुसार, प्रियंका चोप्राने तिचे सर्व फ्लॅट्स 16.17 कोटी रुपयांना विकले आहे. हे चार फ्लॅट मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या ओबेरॉय स्काय गार्डनमध्ये आहेत. यातील तीन फ्लॅट 18 व्या मजल्यावर आहेत तर एक फ्लॅट 19 व्या मजल्यावर आहे. फ्लॅट क्रमांक 1801/A श्रुती गौरव सचदेवा यांनी 3 कोटी 45 ​​लाख 11 हजार 500 रुपयांना खरेदी केला होता. 1,075 चौरस फुटांच्या या फ्लॅटसाठी 17 लाख 26 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

तर फ्लॅट क्रमांक 1801/C स्नेहा डांग सचदेवाने 2 कोटी 85 लाख रुपयांना खरेदी केला होता. 885 चौरस फुटांच्या या फ्लॅटसाठी 14 लाख 25 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले. फ्लॅट क्रमांक 1901/C रौनक त्रिलोका सचदेवा यांना 3 कोटी 52 लाख रुपयांना विकण्यात आला. या 1 हजार 100 चौरस फुटांच्या फ्लॅटसाठी 21 लाख 12 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले. फ्लॅट्सच्या जोडीचा (1801/B आणि 1901/B) सौदा 6 कोटी 35 लाख रुपयांना झाला होता. तो रजनी त्रिलोक सचदेवा यांनी खरेदी केली असून 31 लाख 75 हजार रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

देसी गर्ल अमेरिकेत स्थायिक

प्रियांका चोप्राने 2018 साली अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केले. लग्नानंतर प्रियंका भारत सोडून अमेरिकेत कायमची शिफ्ट झाली. ती पती निक आणि मुलगी मालतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते. पण ती वेळोवेळी भारताला भेट देत असते. नुकतीच प्रियांका ही तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नासाठी भारतात आली होती. तिच्या कामाबद्दल बोलायचे झालं तर, तिने 2019 च्या ‘स्काय इज द पिंक’ चित्रपटात बॉलिवूडमध्ये शेवटचं काम केले होते. तिच्या आगामी प्रकल्पांमध्ये ‘द ब्लफ’ आणि ‘हेड ऑफ स्टेट’ यांचा समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.