AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राखी सावंत हिला होणार अटक? कोर्टात घेतली धाव, ‘ते’ प्रकरण भोवण्याची शक्यता

राखी सावंत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलीये. राखी सावंत ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. आता राखी सावंत हिच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. एक प्रकरण राखीच्या चांगलेच अंगलट आल्याचे बघायला मिळतंय.

राखी सावंत हिला होणार अटक? कोर्टात घेतली धाव, 'ते' प्रकरण भोवण्याची शक्यता
Rakhi Sawant
| Updated on: Apr 21, 2024 | 4:53 PM
Share

राखी सावंत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळेही अधिक चर्चेत आलीये. राखी सावंत हिने मोठा खुलासा करत सांगितले होते की, आपण लग्न केले असून मुस्लीम धर्म स्वीकारला आहे. राखी सावंत हिचे हे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाले होते. काही दिवसांनंतरच राखी सावंत हिने पतीवर गंभीर आरोप केले. हेच नाही तर राखीचा एक्स पती आदिल दुर्रानी खान याला काही दिवस जेलमध्ये राहण्याची देखील वेळ आली. यानंतर आदिल दुर्रानी याच्याकडूनही राखी सावंतवर गंभीर आरोप करण्यात आले.

आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यावर अश्लील व्हिडीओ लीक करण्याचा आरोप केला. हेच नाही तर हे प्रकरण आता थेट कोर्टापर्यंत जाऊन पोहचले आहे. 22 एप्रिलला राखी सावंतच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आदिल दुर्रानी याचा आरोप आहे की, राखी सावंत हिने त्याचे अत्यंत खासगी व्हिडीओ हे व्हायरल केले आहेत. यावर त्याने एफआयआर देखील नोंदवली होती.

आता राखी सावंत हिला अटक होणार की, नाही हे उद्या 22 एप्रिलला स्पष्ट होईल. हायकोर्टात राखीने धाव घेतली. राखीच्या वकिलाचे म्हणणे आहे की, राखी हिची तब्येत खराब आहे. हेच नाही तर राखीवर शस्त्रक्रिया देखील केली जाऊ शकते, असेही तिच्या वकिलाने म्हटले आहे, तो व्हिडीओ पाच वर्षांच्या अगोदरचा असल्याचे देखील सांगितले जात आहे.

राखी सावंत हिच्यासोबतच्या वादानंतर काही दिवसांमध्ये आदिल दुर्रानी याने सोमी खान हिच्यासोबत लग्न केले. हेच नाही तर आदिल दुर्रानी आणि सोमी खान हे सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या आयुष्याबद्दल खुलासे करताना दिसतात. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते, हेच नाही तर मारहाणीचाही आरोप तिने केला होता.

राखी सावंत हिच्या तक्रारीनंतर आदिल दुर्रानी काही दिवस जेलमध्येही होता. जेलच्या बाहेर आल्यानंतर आदिल दुर्रानी याने राखीवर गंभीर आरोप केले होते. मध्यंतरी राखी सावंत हिने म्हटले होते की, माझे काम खूप वाढले आहे. मला आयुष्यात एका पार्टनरची खूप जास्त गरज आहे. त्यानंतर चर्चा होती की, राखी सावंत ही परत एकदा लग्न करणार आहे. सतत दुबईला जाताना देखील राखी सावंत दिसते.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.