बॉलीवुडमध्ये कोरोनाची पार्टी, आता करिनानंतर संजय कपूर, सोहेल खानच्या बायकोला कोरोना, आलिया, करिश्माचं काय होणार?

बॉलीवुडमध्ये कोरोनाची पार्टी, आता करिनानंतर संजय कपूर, सोहेल खानच्या बायकोला कोरोना, आलिया, करिश्माचं काय होणार?
Karishma-amrita-Kareena-Maheep

अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर (Mahip Kapoor) हिचा रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यासोबतच सोहेल खानची पत्नी सीमा खानचाही (Seema Khan) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या चारही सेलिब्रिटी इंडस्ट्रीमध्ये ‘गर्ल गॅंग पार्टी’साठी खूप प्रसिद्ध आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 14, 2021 | 12:23 PM

मुंबई : बऱ्याच काळानंतर लोक पुन्हा सामान्य जीवन जगू लागले आहेत, पण कोरोना विषाणूचा धोका अद्याप संपलेला नाही. अशा परिस्थितीत हा रोग पुन्हा एकदा हातपाय पसरू लागला आहे. सोमवारीच (13 डिसेंबर) करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अमृता अरोरा (Amruta Arora) यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता त्यांच्यानंतर आणखी दोन सेलिब्रिटीही या विषाणूच्या विळख्यात अडकल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर (Maheep Kapoor) हिचा रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यासोबतच सोहेल खानची पत्नी सीमा खानचाही (Seema Khan) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या चारही सेलिब्रिटी इंडस्ट्रीमध्ये ‘गर्ल गॅंग पार्टी’साठी खूप प्रसिद्ध आहेत. आता महीप आणि सीमालाही कोरोनाची लागण झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

एकत्र पार्टी!

रिया कपूर आणि करण जोहरच्या पार्टीला करीना कपूर खान, अमृता अरोरा, सीमा खान, महीप कपूर यांनी हजेरी लावली होती. तर मसाबा गुप्ता, मलायका अरोरा आणि करिश्मा कपूरही रियाच्या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. आता महीपच्या कोरोना रिपोर्टबद्दल माहिती देताना संजय कपूर मीडियाला म्हणाले की, ‘होय, तिला सौम्य कोरोना लक्षणांसह कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तिला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.’ आता या पार्टीत सामील करीना कपूर, अमृता अरोरा, महिप कपूर, सीमा खान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तर, करण जोहर याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

बीएमसीकडून चाचणी करून घेण्याचे आवाहन

सीमा खान, महिप कपूर यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यासोबत पार्टीत सहभागी झालेल्या इतर सेलिब्रिटींवरही कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. करीना आणि अमृता कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर BMC ने या दोघींच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना RTPCR चाचणी करून घेण्याचे आवाहन केले होते.

कोरोनाचा बॉलिवूडलाही मोठा फटका

बॉलिवूडचे अभिनेते, अभिनेत्री पार्ट्या करण्यात आता व्यस्त असले तरी काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे बॉलिवूडचेही मोठे नुकसान झाले आहे. बॉलिवूडवर अलंबून असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यानंतर आता कुठे थोडा दिलासा मिळाला होता, सिनेमागृहे पुन्हा उघडली होती. बॉक्स ऑफिसवर पुन्हा तेजी आली आहे. अशातच ओमिक्रॉनचा शिरकाव आणि बॉलिवूडमध्ये कोरोना याने चिंता पुन्हा वाढवली आहे.

हेही वाचा :

Vicky-Ankita Wedding | ‘आज मेरे यार की शादी है..’ अंकिता लोखंडे-विकी जैनच्या संगीत सोहळ्याला कंगनाने लावले चार चांद!

Happy Birthday Rana Daggubati | फोटोग्राफीचे व्यवसायिक शिक्षण, अभिनयच नव्हे ‘या’ क्षेत्रातही राणा दग्गुबाती अव्वल!

Happy Birthday Sameera Reddy | आई झाल्यानंतर नैराश्यात गेली, आता मनोरंजन विश्वापासून दूर राहतेय समीरा रेड्डी!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें