बिग बॉस संपल्यानंतर ‘पठाण’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे शूटिंग करणार सलमान खान!

बिग बॉस संपल्यानंतर 'पठाण' या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे शूटिंग करणार सलमान खान!

बिग बॉस 14चे शूटिंग संपल्यानंतर सलमान खान ‘पठाण’ (Pathan) चित्रपटाचे शूटिंग करणार आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Feb 16, 2021 | 5:08 PM

मुंबई : बिग बॉस 14चे शूटिंग संपल्यानंतर सलमान खान ‘पठाण’ (Pathan) चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. ‘झिरो’ चित्रपटानंतर सलमान ‘पठाण’ चित्रपटात काम करणार आहे. ‘बिग बॉस’ च्या विकेंट वारमध्ये स्वत: सलमानने यांची माहिती दिली आहे. शो संपल्यानंतर तो प्रथम ‘पठाण’ नंतर ‘टायगर 3’ आणि नंतर ‘कभी ईद कभी दिवाळी’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल. (After the shooting of Bigg Boss, Salman Khan will shoot the film ‘Pathan’)

‘टायगर 3’ चित्रपटाचे पहिले वेळापत्रक मार्च 2021 च्या तिसर्‍या आठवड्यात मुंबईत होईल. चित्रपटाचे दुसरे वेळापत्रक मिडल इस्टमध्ये असण्याची शक्यता आहे आणि तिसरे आणि शेवटचे वेळापत्रक पुन्हा मुंबईत होईल. शाहरुख खानचा चित्रपट पठाणची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत, ज्यांनी यापूर्वी वॉरसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. पठाण हा चित्रपट एक मोठा मल्टीस्टारर चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग भारतातच नाहीतर जगातील वेगवेगळ्या प्रसिध्द ठिकाणी सुरू आहे.

बुर्ज खलिफा तेथे मार्चमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ आनंद, आदित्य चोप्रा आणि शाहरुख खान अ‍ॅक्शन सिन करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचा सेटचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओंमध्ये शाहरुख एका फिरत्या ट्रकच्या वर जबरदस्त अ‍ॅक्शन सीन करताना दिसत होता.

संबंधित बातम्या : 

चर्चांना पूर्णविराम! विजय सेतूपति सांगितले ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून एक्झिटचे कारण

‘रुही’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, राजकुमार-जाह्नवीच्या जबरदस्त अभिनय!

अभिनेता संदीप नहारची हत्या? गळ्यावर जखमा, पत्नीवर संशय, मोठं ट्विस्ट

(After the shooting of Bigg Boss, Salman Khan will shoot the film ‘Pathan’)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें